दरड कोसळल्याने मुंबई-गोवा हायवेच्या पर्यायी मार्गावर एकेरी वाहतूक

या मार्गावर फक्त एकेरी वाहतूक सुरू केली आहे, प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी न फिरकल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय.

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 10:57 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा हायवेच्या पर्यायी मार्गावर एकेरी वाहतूक

चंद्रकांत बनकर, 28 जुलै : मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील आवाशी - शेलडी मार्गावर दरड कोसळलीय. घाट रस्त्यात मोठमोठी झाडे आणि दरड रस्त्यावर आल्याने हा मार्ग रविवारी दुपारी पासून बंद करण्यात आलाय. शासनाच्या आपत्ती व्ययस्थापन कक्षात कळवून देखील रात्री उशिरा पर्यंत कसलीही मदत मिळाली नाही अखेर रखडलेल्या ग्रामस्थांनी स्वतः भेटेल त्या कोयती ,कुऱ्हाडीने , मार्गावर आलेली झाडे तोडली, तर घमेले ,फावडे घेऊन मार्गावरील दरड जमेल तेवढी हटवली असून, एकेरी वाहतूक सुरू केली आहे, प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी न फिरकल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय.

कशेडी घाटात रस्त्याला तडे

मुंबई - गोवा महामार्गावर खेड ते पोलादपूर च्या दरम्यान कशेडी घाटात एक वळणावर महामार्ग खचत असून, लांबच्या लांब भेगा पडल्या आहेत, पावसाचा जोर वाढत असल्याने संध्याकाळी या भेगा रुंदावल्या आहेत. दरीकडील भाग देखील खचत असून महामार्ग पोलिसांनी या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू केलीय. वाहन चालकांना वाहने सावकाश चालवण्याचं आवाहन कशेडी टॅप महामार्ग पोलिसांनी केलंय. रस्ता खचलेल्या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत.

मंत्री असूनही पंकजा मुंडेंनीच उद्योग बंद पाडले - धनंजय मुंडे

पुन्हा मुसळधार पावसाचा धोका

Loading...

मुंबई आणि कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस उसंत घेण्याची काही शक्यता नाही. पुढचे चार ते पाच दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुढचे पाच दिवस रायगड आणि कोकणात अती मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मुंबई आणि ठाणे परिसरातही मुसळधार पाऊस बरसणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला आहे. या सोबतच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही दमदार पाऊस होईल असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

मुंबई पोलीस देताहेत आता 'डांसबार'मध्ये पहारा

गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. उष्माही प्रचंड प्रमाणात वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा परतला आहे. मुंबईजवळच्या कर्जत आणि वांगणी परिसरात दोन दिवसांपासून प्रचंड पाऊस झाल्याने उल्हास नदी ओव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे हा परिसर पूर्ण पाण्याने वेढला होता. त्यात महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्याने NDRF आणि नौदलालाही पाचारण करण्यात आलं होतं. एक्सप्रेसमधल्या 1 हजारांपेक्षा जास्त लोकांना बचाव पथकाने बाहेर काढलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 10:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...