S M L

मराठवाडा,विदर्भाला गारपिटीचा तडाखा, तिघांचा मृत्यू

गारपिटीमुळे कांदा , गहू, हरभरा पिकाचे नुकसानीची शक्यता आहे.

Sonali Deshpande | Updated On: Feb 11, 2018 02:34 PM IST

मराठवाडा,विदर्भाला गारपिटीचा तडाखा, तिघांचा मृत्यू

11 फेब्रुवारी : मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जालन्यातील वंजार उमरद गावातील 70 वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा इथले 60 वर्षीय वृद्ध आसाराम गणपत जगताप यांचा मृत्यु झालाय तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झाला असून, आणखी एक महिला जखमी आहे.

अकोल्यातल्या  बाळापूर तालुक्यातील अंदुरा आणि परिसरात सकाळी ७:३० दरम्यान विजेच्या कडकडासह पाऊस झाला. त्याचवेळेस गारपीटही सुरु झाली. गारपिटीमुळे कांदा , गहू, हरभरा पिकाचे नुकसानीची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने गारपीटीसह पाऊस होण्याचा शारा देखील दिला होता. आज रविवारी भल्या पहाटे जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागात तसेच मंठा तालुक्यात आज सकाळी 7 ते 8 वाजेपर्यन्त 1 तास गारपीटीसह जोरदार पाऊस झालाय.विशेष म्हणजे सध्या पिक काढणीचे दिवस असून गहू, ज्वारी, हरभरा सोंगणे आणि मळणी यंत्रातून काढणीचे दिवस आहेत आणि अशातच बळीराजावर अवकाळी पावसाचे संकट कोसळले.  परिणामी हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून जात असल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. दरम्यान आज सकाळी झालेल्या गारपिटीमुळे वित्त हानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गारपिटीचा फटका कोणकोणत्या पिकांना बसलाय ते पाहूया-

Loading...

गहू

हरभरा

करडई

आंबा

पपई

संत्रा

कांदा

ज्वारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2018 09:33 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close