S M L
Football World Cup 2018

अल्पवयीन विद्यार्थांना घेऊन आंदोलन केल्यामुळे कोल्हापुरच्या 80 शिक्षकांवर गुन्हे दाखल

कोल्हापूरमध्ये 80 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल अल्पवयीन विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 14, 2018 07:14 PM IST

अल्पवयीन विद्यार्थांना घेऊन आंदोलन केल्यामुळे कोल्हापुरच्या 80 शिक्षकांवर गुन्हे दाखल

14 मार्च : कोल्हापूर मधलं शिक्षण वाचवा आंदोलन चिघळणार अशीच चिन्ह सध्या दिसत आहेत. कोल्हापूरमध्ये 80 शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल अल्पवयीन विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन केल्यामुळे त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्षकांनी विद्यार्थांना घेऊन आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी नोटीसा धाडल्या होत्या पण त्या नोटीसा शिक्षकांकडून जाळण्यात आल्या. त्यामुळे सरकारी कागदपत्र जाळल्यामुळेही या शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या कारवाईचा शिक्षक आणि पालकांकडून निषेध करण्यात आला आहे. कोल्हापूरमधल्या 7 शाळांच्या शिक्षकांवर कारवाई होणार आहे. कलम 341 प्रमाणे शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूरमधल्या 34 शाळा वाचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2018 07:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close