डीएसकेंच्या अडचणीत वाढ, जावयाने ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

केदार वांजपे यांनी डीएसके विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 10:14 PM IST

डीएसकेंच्या अडचणीत वाढ, जावयाने ठोकला 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

25 डिसेंबर : बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्याच्या भावाचे जावई असलेले केदार वांजपे यांनी डीएसके विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

डीएसकेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या भावाचा जावई केदार वांजपेंवर आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवत असल्याचा तसंच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांना आपल्या आणि आपल्या व्यवसायाबद्दलची माहिती पुरवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. यालाच धरून आता त्यांचे जावई केदार वांजपे यांनी डीएसकेंवर 100 कोटींच्या बदनामीचा कोटींचा दावा ठोकला आहे.

केदार वांजपे हे आधी डीएसकेंबरोबर काम करत होते. ड्रीम सिटीसाठी जागा खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण पुढे डीएसके आणि वांजपेंमधे आर्थिक कारणांवरुन वाद झाला आणि वांजपे 2009 मध्ये डीएसकेंपासून वेगळे झाले होते. यामुळे आधीच कायदेशीर अडचणींना तोंड देत असलेले डीएस कुलकर्णींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 10:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...