S M L

डीएसकेंना सीएमडी पदावरून हटवलं ; शिरीष कुलकर्णी 'डीएसके'चे नवे सीएमडी

आर्थिक संकटात सापडलेल्या डीएसके उद्योग समुहाच्या सीएमडी पदावरून डी. एस. कुलकर्णी यांनाच हटवण्यात आलंय. डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हे आता डीएसके ग्रूपचे नवे सीएमडी असणार आहेत. डीएसकेंचे सगळे अधिकार काढून घेण्यात आलेत.

Chandrakant Funde | Updated On: Sep 7, 2017 06:39 PM IST

डीएसकेंना सीएमडी पदावरून हटवलं ; शिरीष कुलकर्णी 'डीएसके'चे नवे सीएमडी

पुणे, 7 सप्टेंबर : आर्थिक संकटात सापडलेल्या डीएसके उद्योग समुहाच्या सीएमडी पदावरून डी. एस. कुलकर्णी यांनाच हटवण्यात आलंय. डीएसके यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हे आता डीएसके ग्रूपचे नवे सीएमडी असणार आहेत. डीएसकेंचे सगळे अधिकार काढून घेण्यात आलेत. दुसरीकडे डीएसके टोयोटाच्या दोनशे कर्मचाऱ्यांनी डीएसकेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलंय. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही. तर ठेवीदारांनी डीएसकेंविरोधात तक्रारी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केलीये.

दरम्यान, कंपनीवरील आर्थिक संकटाचा आणि या व्यवस्थापकीय फेरबदलाचा काही संबंध आहे का? की निव्वळ कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी डीएसकेंनी कुटुंबियांनीच ही शक्कल लढवलीय. हे अजून समजू शकलेलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार स्वतः डीएसके आणि त्यांचा मुलगा शिरीष वेगवेगळे राहतात. त्याच्यात मतभेद असल्याच्याही मध्यंतरी चर्चा होत्या, पण नेमकं खरं काय आहे हे माहिती नाही मात्र, आता डीएसके डेव्हलपर्सच्या सीएमडी पदावरून डीएसकेंना हटवल्याचं वृत्तं नक्कीच खरं आहे. कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आजच्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. कंपनीचे नवे सीएमडी तरी 'डीएसके'ला आर्थिक संकटातून बाहेर काढताहेत की नाही याकडेच गुंतवणूकदारांचं लक्षं लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 06:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close