News18 Lokmat

दारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं

अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला आणि गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला आपटले.

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2018 08:31 PM IST

दारूच्या नशेत बापाने 2 वर्षांच्या मुलीला भिंतीवर आपटून संपवलं

मुजीब शेख, नांदेड, 17 आॅक्टोबर : दारूच्या नशेत पित्याने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला भिंतीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात घडली.

हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात राहणाऱ्या 37 वर्षीय प्रभाकर इंगळे याला दारूचे व्यसन आहे. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन आला. दारूच्या नशेत त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली.

यावेळी दोन वर्षाची अनुराधा उर्फ अंजली आईच्या कडेवर होती. अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला आणि गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला भिंतीवर आपटले. डोक्याला जबर मार लागल्याने अंजली बेशुद्ध पडली.

Loading...

तिला हिमायतनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ती कोमात गेल्याचं आरोग्य केंद्रातील डॉक्टरानी सांगितलं. प्रकृती गंभीर असल्याने अंजलीला नांदेडला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्णवाहिकेतून नांदेडला उपचारासाठी आणताना वाटेतच अंजलीचा मृत्यू झाला. 17 ऑक्टोबर रोजी मयत अंजली हिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. यावेळी आई अर्चना इंगळे हिने स्वता:हुन फोन करून ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.

हिमायत नगर पोलिसांनी तातडीने अर्जना इंगळे हिचा जबाब नोदवून गुन्हा दाखल केला. आरोपी बाप प्रभाकर इंगळेला पोलिसांनी अटक केली. प्रभाकर इंगळेला दोन मुली होत्या. चिमुकल्या अनुराधाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2018 08:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...