पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या 'झिंगाट' तरुणींना सिंघम लेडीने धु-धु धुतले

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2018 06:57 PM IST

पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या 'झिंगाट' तरुणींना सिंघम लेडीने धु-धु धुतले

 विजय देसाई, 02 आॅक्टोबर : भाईंदर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला सिंघम पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील यांनी रात्री नशेत तर्र झालेल्या युवतींना चांगलाच चोप दिला. दारूच्या नशेत या तरुणींनी पोलिसांनाच शिवीगाळ सुरू केली होती. त्यामुळे मनीषा पाटील यांनी भररस्त्यावर या मद्यधुंद तरुणीची नशा उतरवली.

ही घटना सोमवारी रात्री 1.55 ला भाईंदर पश्चिम मैक्सेस मॉल जवळ घडली. चौघ्या मुली रात्री एका पार्टीत गेल्या होत्या.  तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि मॅक्सेस मॉलजवळ आपसात भांडत होत्या. तिथे असलेला नागरिकांनी भाईंदर पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पेट्रोलिंगला असलेल्या पोलीस अधिकारी मनीषा पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तिथे पोहचली. पाटील यांनी मुलींना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु नशेत असलेला मुलींने त्यांच्याशी भांडणं सुरूच ठेवली. त्या इतक्या नशेत होत्या की आपण काय बोलतो याचं भान नव्हतं. त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर मनिषा पाटील यांनी या तरुणींची  भररस्त्यावर धुलाई करीत गाडीत बसवले.

भाईंदर पोलिसांनी चार युवतींवर पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे याबाबत गुन्हे दाखल केले आहे. अलिशा अयोस पिल्ले, कमला श्रीवास्तव, ममता मेयर आणि पडाळी डिकोस्टा असं आरोपी मुलींची नावं आहे. यापैकी तीन मुलींना पोलिसांनी अटक केलीये. तर पडाळी डिकोस्टा फरार आहे.

=========================================================================================

VIDEO: लोकलमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या तरुणीचा तोल गेला, मात्र...!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2018 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...