दुष्काळाचा फटका, भटक्या कुत्र्यांनी केली हरणाची शिकार

दिवसेंदिवस जंगलातले पाणवठे कमी होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी पिण्यासाठी आपली हद्द ओलांडून बाहेर यावं लागतं त्यामुळे अशा घटना घडत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 27, 2019 06:22 PM IST

दुष्काळाचा फटका, भटक्या कुत्र्यांनी केली हरणाची शिकार

सांगली 27 मे : दुष्काळाचा फटका माणसांसोबत प्राण्यांनाही बसतोय. बेसुमार जंगतोड आणि पाण्याच्या अभावामुळे जंगली प्राणी हे शेजारच्या गावांमध्ये आणि पाणवठ्याजवळ हे प्राणी येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना सांगली जिल्ह्यात घडली. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तडसर येथे पोट कॅनॉल मध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणांची शिकार केलीय.

पुरेसा चारा आणि पाणी नसल्याने सागरेश्वर अभयारण्य मधील हरणे कडेगाव तालुक्यात भटकत आहेत. सोमवारी पहाटे हरीण कुत्र्यांच्या तावडीत सापडली आणि जंगली कुत्रे हरणीच्या मागे लागला आणि हरीण जीव वाचवत कॅनॉल वरून जात असताना कॅनॉल मध्ये पडली आणि कुत्र्याने हरणाचे लचके तोडले. यावेळी तडसर मधील ग्रामस्थांनी हरणाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र भटक्या कुत्र्यांनी हरणाला काही सोडले नाही. घटनास्थळी वन अधिकारी येऊन पंचनामा केला आहे.

दिवसेंदिवस जंगलातले पाणवठे कमी होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात प्राण्यांना पाणी पिण्यासाठी आपली हद्द ओलांडून बाहेर यावं लागतं त्यामुळे अशा घटना घडत असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहेत. या आधी पाण्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. तर विदर्भात अनेक गावांमध्ये वाघांचा वावर वाढला आहे. तर मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असल्याने तिथले बिबटे मुलूंड, अंधेरी आणि ठाण्यासारख्या दाट लोकवस्तिच्या भागात घुसल्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.

जंगतोड रोखणं, नवीन झाडं लावणं आणि जंगलात पाणवढे निर्माण केले तरच असा संघर्ष रोखता येणार आहे.असे प्रयत्न केले नाहीत तर जंगली प्राणी मानवी वस्तित येण्याचं प्रमाण वाढेल आणि नवीन संकट निर्माण होईल अशी भितीही व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: drought
First Published: May 27, 2019 06:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...