शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेळ्या, मेढ्यांसाठी देखील चारा छावण्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेळ्या, मेढ्यांसाठी देखील चारा छावण्या

Drought Situation in Maharashtra : शेळ्या, मेंढ्यांसाठी देखील सरकारनं अनुदान केलं जाहीर.

  • Share this:

औरंगाबाद, सिद्धार्थ गोदाम 02 जून : दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. त्यामुळे जनावरांना जगवायचं कसं? असा प्रश्न उभा राहिला आहे. पाण्यासाठी होणारी वणवण, चारा-पाण्याअभावी जनावरांचे होणारे हाल या गोष्टी असह्य करणाऱ्या. सारी मदार ही टँकरवर. जनावरांना जगवण्यासाठी सरकारनं, काही संस्थांनी चारा छावण्या सुरू केल्या. त्यामुळे दिलासा मिळाला. प्रश्न काही संपले नव्हते. पण, सरकारनं घेतलेल्या आणखी एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळाला आहे. राज्यातील शेळ्या, मेढ्यांसाठी देखील चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतला आहे.त्याप्रकारची परवानगी देखील देण्यात आली आहे. सरकारनं तसा जी. आर देखील काढला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रति शेळ्या, मेंढ्यांमागे 25 रूपये देणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली. शिवाय, चंद्रकांत पाटील हे एक दिवसाच्या दुष्काळ दौऱ्यावर जाणार आहेत. राज्य सरकारनं चारा छावण्यांचे 25 कोटींचे अनुदान विभागीय आयुक्तांच्या खात्यावर जमा केले असल्याची माहिती देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.


विधानसभा निवडणूक : राज ठाकरेंच्या मॅरेथॉन दौऱ्याला आजपासून सुरुवात

राज्यात भीषण दुष्काळ

राज्यात भीषण दुष्काळ आहे. विहिरींनी,तळ्यांनी तळ गाठले आहे. लोकांनी गाव सोडून जाणंच पसंत केलं आहे. सरकारनं उचललेली पावलं देखील आता कमी पडू लागली आहेत. चारा छावण्या, पाण्याचे टँकर अशा प्रकारचे प्रयत्न सरकारी पातळीवर देखील केले जात आहेत. दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत असून पावसाच्या आगमनाकडे आता सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

राज्यात यंदा सरासरी पावसाच्या अंदाजे 95 ते 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे किमान दिलासा हा दुष्काळाग्रस्त भागाला मिळाला आहे. पण, सर्वाचे डोळे लागले आहेत ते वरूणराजाच्या आगमनाकडे.


VIDEO: भरधाव ट्रकच्या धडकेत 6 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: drought
First Published: Jun 2, 2019 09:15 AM IST

ताज्या बातम्या