S M L

यावर्षी मराठवाड्यातील 3,500 गावांवर दुष्काळाचं सावट ?

विभागातील आठ हजार 525 पैकी तब्बल तीन हजार 577 गावांची अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 8, 2018 05:38 PM IST

यावर्षी मराठवाड्यातील 3,500 गावांवर दुष्काळाचं सावट ?

08 जानेवारी : मराठवाड्यातील तब्बल साडेतीन हजार गावांना यावर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. विभागातील आठ हजार 525 पैकी तब्बल तीन हजार 577 गावांची अंतिम पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

यंदा मराठवाड्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ८६ टक्के पाऊस झाला. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला. त्यामुळे या जिल्ह्यांतील बहुतांश गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली आहे.

औरंगाबाद (१३५४), परभणी (८४९) जिल्ह्यातील संपूर्ण गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली असल्याने या दोन जिल्ह्यात चिंता अधिक आहे. या शिवाय नांदेड जिल्ह्यातही कमी पाऊस असल्यामुळे येथेही पिकांचे मोठे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील १५६२पैकी ११६८ गावांमध्ये उन्हाळ्यापूर्वीचं टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जालना तालुक्यात ३५ गावांमध्ये कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची उगवण झाली नाही. पिकांची वाढ न झाल्यामुळे ३५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. पैसेवारी कमी आलेल्यांमध्ये लातूर जिल्ह्यातील १७१ गावांचा समावेश आहे.

मराठवाड्यात यंदा पावसाळ्यात १५३ दिवसांपैकी विभागात केवळ ५९ दिवस वरुणाराजने कृपादृष्टी केली. विभागात पावसाळ्यातील तब्बल ९४ दिवस कोरडे गेल्याने अशी स्थिती निर्माण झाली. जून महिन्यात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ११८ टक्के पाऊस झाला, मात्र जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. जुलै महिन्यात केवळ ३६ टक्के पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात १०७, सप्टेबरमध्ये ७७ आणि ऑक्टोबर महिन्यात १२९ टक्के झालेल्या पावसाची टक्केवारी ८६पर्यंत पोचली.

पावसातील मोठ्या खंडामुळे मूग, उडीद, सोयाबीन यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागांमध्ये कापसाचे पीक चांगले आले, मात्र पहिल्या काढणीनंतर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर यंदा मोठे संकट कोसळले.

Loading...
Loading...

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाने आठ हजार ५२५ गावांच्या जाहीर केलेल्या खरीप पिकांच्या हंगामी पैसेवारीत तीन हजार ५७७ गावांची पैसेवारी ही ५०पेक्षा कमी आहे. यात बहुतांश गावे औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे येत्या काळात येथील ग्रामस्थांना दुष्काळच्या झळा सोसाव्या लागतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट

- मराठवाड्यात एकूण गावं - 8525

- किती गावांना दुष्काळाचा धोका ? 3577

- 3577 गावांची पैसेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी

- बहुतांश गावं औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातली

- गेल्या पावसाळ्यात 153 पैकी 94 दिवस कोरडे

गेल्यावर्षीच्या पावसाची टक्केवारी

- सरासरी 86%

- जून - 118%

- जुलै- 35%

- ऑगस्ट - 107%

- सप्टेंबर - 77%

- ऑक्टोबर - 129%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 05:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close