जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात 3 महिन्यांपासून वाया जातेय लाखो लिटर पाणी!

संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असताला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मतदार संघातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरंदर उपसा योजनेतून 100 दशलक्ष घनफूट पाण्याची गळती सुरु असून तीन महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 07:23 PM IST

जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात 3 महिन्यांपासून वाया जातेय लाखो लिटर पाणी!

बाळसाहेब काळे (प्रतिनिधी)

पुरंदर, 6 जून- संपूर्ण राज्य दुष्काळात होरपळत असताला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मतदार संघातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरंदर उपसा योजनेतून 100 दशलक्ष घनफूट पाण्याची गळती सुरु असून तीन महिन्यांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र, सरकारी यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

दुष्काळी परिस्थितीत पुरंदर तालुक्यातीळ सुमारे पाऊण लाख लोकसंख्येला 50 टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जेथे तिथे शेती पिकवणे शक्यच नाही. मात्र तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील परीसराला नवसंजीवनी देनार्‍या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या राजेवाडी नाझरे बारामतीसाठीच्या वितरिकेतून गेल्या तीन महिन्यांपासून पिसर्वे भोसलेवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होतेय. या गळतीमुळे परिसरातील 25 एकर क्षेत्रावर चांगलीच दलदल निर्माण झाली आहे. परिसरातील पेरु, डाळिंबाच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डाळिंब उत्पादकांचे 20 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तर वितरकेच्या पाईपलाईन गळतीतून दररोज लाखो लीटर पाणी वाया जातेय. होणार्‍या गळतीतून परिसरातील शेतजमिनीत पाणी घूसल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सुमारे चार हजार डाळिंब आणि पेरुच्या झाडांच्या बागांचे नुकसान झाले आहे. याशिवाय गळतीतून या परिसरातील सात ते आठ पाझर तलाव, नाले भरून गेले आहे. पुरंदर उपसा योजनेतून मिळणार्‍या पाण्याचे एक दशलक्ष घनफूट पाणी घेण्यासाठी शेतकर्‍यांना 16 ते 17 हजार रुपयांचे बील अदा करावे लागते. त्यानंतरच पाणी मिळते. बिले अदा करून ही शेतकर्‍यांना तीन-तीन महिने पाण्याची वाट पहावी लागते. दुसरीकडे याच योजनेतील अत्यंत महागडे पाणी केवळ पुरंदर उपसा योजनेच्या ढीसाळ यंत्रणेकडून पाणी वाया जात आहे. रात्रंदिवस होणार्‍या या गळतीतून सुमारे 100 दशलक्ष घनफूट पाणी वाया गेल्याचा आरोप होत आहे. गळतीतून वाया गेलेल्या पाण्याचे बील शेवटी शेतकर्‍यांच्याच माथी मारले जाणार असल्याने लाभार्थी शेतकर्‍यांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. वितरिकेच्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर होणार्‍या गळतीची तक्रार गेल्या दोन महिन्यापासून संबधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून करण्यात येत होत्या. मात्र अधिकार्‍यांकडून कोणतीच दखल घेतली गेली नाही. याशिवाय अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण सहकार्याने योजनेच्या पाईपलाईनवर अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना छिद्रे पाडून पाणी दिले जात आहे. मोठा भ्रष्टाचार या योजनेतून होत आहे.

वाया गेलेल्या पाण्याचे सुमारे 16 ते 17 लाख रुपयांचे बील पुरंदर उपसा योजनेच्या अधिकार्‍यांकडून वसूल करावे. त्याच बरोबर फळबागात पाणी जाऊन शेतकर्‍यांच्या बागांचे बहर धरूनही उत्पन्न काढता न आल्याने झालेले सुमारे 20 लाखांचे नुकसान कोण भरून देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गळती झालेल्या पाण्याचे बिल तसेच शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पुरंदर उपसा जलसिंचन योजेच्या अधिकार्‍यांकडून वसूल करावे अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मतदार संघात ऐन दुष्काळी परिस्थितीत होत असलेली गळतीकडे शिवतारेचे दुर्लक्ष का? असा सवाल ही उपस्थित होत आहे.

Loading...

या गळती सदर्भात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकार्‍यांशी आमच्या प्रतींनिधीकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अधिकार्‍यांकडून कोणताच प्रतिसाद देण्यात आला नाही.


VIDEO : प्रकाश मेहता प्रकरणी धनंजय मुंडेंचं फडणवीसांवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...