शरद पवार घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; बारामतीच्या या प्रश्नावर होणार चर्चा

Drought In Maharashtra : शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 09:10 PM IST

शरद पवार घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट; बारामतीच्या या प्रश्नावर होणार चर्चा

मुंबई, सागर कुलकर्णी, 06 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी ( उद्या ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ, पाणी टंचाईवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. यावेळी बारामतीच्या पाणी प्रश्नावर देखील यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

काय आहे बारामतीचा पाणीप्रश्न

नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल असंही महाजन म्हणाले होते. तर, आम्हाला आता दुष्काळात राजकारण करायचं नाही. दुष्काळात प्राथमिकता लोकांना पाणी देण्याची आणि जनावर जगवण्याची आहे. आता बाकीचे प्रश्न आणि नंतर राजकारण नंतर,' असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

या मुद्यावर देखील शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.


Loading...

भाजपच्या जवळच्या नेत्याच्या मालमत्तेवर EDचे छापे; शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज लाटल्याचा आरोप

राज्यात दुष्काळ

राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. सारी मदार ही टँकरवर आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागल्या आहेत. जनावरं देखील चारा छावण्यांमध्ये बांधली जात आहेत. सरकार देखील याबाबत ठोस अशा उपाययोजना करताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील साऱ्या स्थितीचा आढावा घेतला आहे.

शरद पवार यांनी देखील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी सारी परिस्थिती समजून घेत याबाबत सरकारशी बोलणार असल्याचं आश्वासन त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलं आहे.


VIDEO : मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...