S M L

केंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहाणी केली पण अंधारात,शेतकरी नाराज!

'शेवटच्या ठिकाणी भेट देताना अंधार झाला तरी काळजीचं कारण नाही, कारण पथकाने दिवसभर पाहणी केल्यामुळं त्यांना परिस्थितीची जाणीव आहे.'

Updated On: Dec 6, 2018 09:38 PM IST

केंद्रीय पथकाने दुष्काळाची पाहाणी केली पण अंधारात,शेतकरी नाराज!

बाळासाहेब काळे, पुरंदर  6 डिसेंबर :  दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आलेलं  केंद्राचं पथक गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी पोहोचलं. पण पथकाला पोहोचायला उशीर झाल्यानं अंधार पडला होता. त्याच अंधारात पथकातल्या सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. शेतकऱ्यांच्या नशिबात कायम अंधारच असतो किमान मदत पथकाने तरी उजेडात यायचं होतं अशी प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.


सातारा जिल्ह्यातील पहाणीनंतर हे पथक पुरंदरला आलं. यात  केंद्रीय अर्थ विभागाचे सह संचालक सुभाषचंद्र मीना, खाद्यान्न विभागाचे उप महाव्यवस्थापक एम. जी. टेंबुरने, तसेच पशुसंवर्धन विभागाचे विजय ठाकरे, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आदींसह मोठा ताफा पुरंदर तालुक्यातील मावडी सुपे आणि राजुरी येथील दुष्काळाची पाहणी करणार होते.मावडी सुपे इथं पोहोचतानाच  अंधार झाल्याने पथकाला पाहणी करता आली नाही. मात्र स्थानिकांशी पथकाने चर्चा केली. स्थानिक शेतकऱ्यांनी दुष्काळाबाबत आपली गाऱ्हाणी पथकासमोर  मांडली .


Loading...

पथकाने पूर्ण पाहणी केली. त्यांनी खरी परिस्थी काय आहे हे प्रत्यक्ष पाहिलं. शेवटच्या ठिकाणी भेट देताना अंधार झाला तरी काळजीचं कारण नाही, कारण पथकाने दिवसभर पाहणी केल्यामुळं नेमकी काय परिस्थिती याचे याची जाणीव त्यांना आहे. सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम  यांनी स्पष्ट केलं.

Video : गावकऱ्यांच्या विचित्र हट्टापायी केला हा अख्खा तलाव रिकामा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 09:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close