अमोल गावंडे, बुलडाणा, 19 जुलै: पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थाला ग्रामसेवकाकडून गोळया घालण्याची धमकी देण्यात आली. पिस्तूल घेऊन नाचतांना ग्रामसेवकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी ग्रामसेवकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण चौकशीवर ठेवलं आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असतांना सुध्दा याबाबत मला काय विचारता? असा उलट प्रश्न त्यांनी ग्रामस्थांना केला. भाग्यवंत असं या ग्रामसेवकाचं नाव आहे.