यावलमध्ये अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरखाली दाबून चालकाचा जागीच मृत्यू

यावल तालुक्यातील इचखेडा शिवारात मशागत करताना ट्रॅक्टर अनियंत्रीत होत उलटले. या भीषण अपघातात चालकाचा ट्रॅक्टरखाली दाबून जागीच मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 07:44 PM IST

यावलमध्ये अनियंत्रित झालेल्या ट्रॅक्टरखाली दाबून चालकाचा जागीच मृत्यू

भुसावळ, 3 जून-यावल  तालुक्यातील इचखेडा शिवारात मशागत करताना ट्रॅक्टर अनियंत्रित होत उलटले. या भीषण अपघातात चालकाचा ट्रॅक्टरखाली दाबून जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. प्रमोद देवराम तायडे (38) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, किनगाव खुर्द परिसरात राहणारे कांदा व्यापारी तसेच भाडे तत्त्वावर शेत मशागत करून देणारे प्रमोद तायडे हे आज इचखेडा शिवारात आले होते. ट्रॅक्टरने (एम.एच. 19 -4719) ते दुपारी शेतविहीरीजवळ काम करत होते. याच दरम्यान त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रॅक्टर उलटले आणि त्याखाली दाबून प्रमोद यांचा जागेवरच मृत्यू झाला.

महात्मा गांधींबद्दलचं ट्वीट IAS निधी चौधरींना भोवलं; मुख्यमंत्र्यांनी केली कारवाई

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत प्रमोद यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, स्थानिकांनी प्रमोद यांचा ट्रॅक्टरखाली दबलेला मृतदेह बाहेर काढला. तसेच शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस कॉन्टेबल सुनील तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रमोद तायडे यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

तिसरी मुलगी झाली, आईने 10 दिवसाच्या चिमुकलीची गळा दाबून केली हत्या

Loading...


VIDEO:विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींनी मिरवल्या तलवारी आणि एअर रायफल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 3, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...