शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तोंडावर शिवनेरीवर वनकर्मचाऱ्यांची दारू पार्टी!

शिवजयंती साठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवनेरीवर येत होते. हे येत असताना शनिवारी रात्री हे वन कर्मचारी दारू पार्टी करत असल्याची बाब समोर आली होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2018 08:39 PM IST

शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तोंडावर शिवनेरीवर वनकर्मचाऱ्यांची दारू पार्टी!

18 फेब्रुवारी: महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! 19 फेब्रुवारी 1630ला महाराजांचा जन्म किल्ले  शिवनेरीवर झाला होता.  पण त्याच शिवनेरीवर आता  महाराजांच्या जयंतीच्या फक्त दीड दिवस आधी 5 वन कर्मचाऱ्यांनी शिवनेरीवर दारू पार्टी केली आहे.

शिवजयंती साठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवनेरीवर येत होते. हे येत असताना शनिवारी रात्री हे वन कर्मचारी दारू पार्टी करत असल्याची बाब समोर आली होती. त्यांनी गडाचं पावित्र्य भंग केल्यामुळे लोक त्यांच्यावर संतापले. पण कुठलीही मारहाण न करता त्यांना पोलीसांच्या हवाली करण्यात आले. आज संंध्याकाळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ माजली आहे.

शिवनेरीचा किल्ला हा  वनविभाग आणि पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे अशा घटना आधीही घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. काही दिवसांपूर्वी   नगरचे उपमहापौर छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आयुष्यभर साखरेच्या खांडाचंही व्यसन नसणाऱ्या आणि शुन्यातून स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महारााजांच्या जन्म ठिकाणीच जर अशा घटना घडत असतील तर   त्यांमा आपण काय आदरांजली देत आहोत ही विचार करण्याची गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close