निर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम

सचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 02:08 PM IST

निर्घृण हत्या आणि तपास असा होता दाभोळकरांच्या हत्येनंतरचा घटनाक्रम

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमागचा चेहरा तब्बल पाच वर्षांनी समोर आला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली. नालासोपारा स्फोटकं प्रकरणातील आरोपी शरद कळसकरनं दिलेल्या जबाबावरून सीबीआयनं सचिन अंदुरेला औरंगाबादमधून अटक केली. याच सचिन अंदुरेनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयनं केलाय. सचिन अंदुरेच्या अटकेसाठी टर्निंग पॉईन्ट ठरला तो म्हणजे एटीएसने नालासोपाऱ्यात स्फोटकांसह अटक केलेल्या वैभव राऊतचा जबाब. गेल्या पाच वर्षात देशाने विचारवंतांना गमावले. दाभोळकरांच्या हत्येपासून ते आरोपींना पकडण्यापर्यंतचा घटनाक्रमावर एक नजर टाकू...

२० ऑगस्ट २०१३- पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या

२० जून २०१४- पुणे

मनीष नागोरी आणि विलास खंडेलवाल यांना अटक

Loading...

डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना गावठी पिस्तूल पुरवल्याचा आरोप

पुणे शहर पोलिसांनी केली अटक

२० फेब्रुवारी २०१५- कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या

३० ऑगस्ट २०१५- कर्नाटक, धारवाड

एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या

एसआयटीचा तपास

१६ सप्टेंबर २०१५- सांगली

पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक

एसआयटीने केली अटक

११ जून २०१६- पनवेल

वीरेंद्र तावडेची सीबीआयकडून अटक

दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयकडून अटक

सध्या जामिनावर बाहेर

VIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि आयएसआयएसचे झेंडे

५ सप्टेंबर २०१७- कर्नाटक, बंगळुरू

गौरी लंकेश यांची हत्या

१७ जून २०१७ - कोल्हापूर

समीर गायकवाडला जामीन मंजूर

२१ मे २०१८- पुणे

अमोल काळेला अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक

अमोल काळेकडील डायरीतून महाराष्ट्रातले धागेदोरे उघड

अमोल काळेच्या डायरीत ३४ जण हिट लिस्टवर

१२ जून २०१८ - विजयपुरा, कर्नाटक

परशुराम वाघमारेला अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक

१० ऑगस्ट २०१८- नालासोपारा

वैभव राऊत एटीएसकडून अटक

सध्या पोलीस कोठडीत

स्फोटकं बनवल्याचा आरोप

१० ऑगस्ट २०१८, नालासोपारा

शरद कळसकर

एटीएसकडून अटक

सध्या पोलीस कोठडीत

रेकी आणि दाभोलकरांवर गोळीबाराचा आरोप

१० ऑगस्ट २०१८-  नालासोपारा

सुधन्वा गोंधळेकर

एटीएसकडून अटक

कटात सहभागी असल्याचा आरोप

१८ ऑगस्ट २०१८- औरंगाबाद

सचिन अंदुरे, सीबीआयकडून अटक

सध्या सीबीआय कोठीत

डॉ. दाभोलकरांवर गोळीबार केल्याचा आरोप

१९ ऑगस्ट २०१८- जालना

श्रीकांत पांगारकरला अटक

एटीएसकडून अटक

सध्या पोलीस कोठडीत

पैसे पुरवल्याचा आरोप

२१ ऑगस्ट २०१८, औरंगाबाद

शुभम सुरळे, अजिंक्य सुरळे, रोहित रेघे यांना अटक

सचिन अंदुरेच्या जबाबानुसार अटक

शस्त्र लपवणे आणि बेकायदा बाळगल्याचा गुन्हा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...