Exclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव!

भरत कुरणेच्या रिसॉर्टवरून न्यूज१८ लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 08:20 AM IST

Exclusive: बेळगावमधल्या चिखले गावात केला होता पानसरे, दाभोलकरांवर गोळी चालवणाऱ्यांनी सराव!

संदीप राजगोळकर बेळगाव, २२ ऑगस्ट- चिखलेगावाशेजारीच भरत कुरणे यांने एक रिसॉर्ट बांधलं होतं. याच रिसॉर्टमधून सगळ्या हत्यांचा कट शिजला. आतापर्यंत पकडलेल्या सगळ्या संशयितांनी  चिखले गावामध्ये हजेरी लावली आहे. निर्मनुष्य असलेल्या या परिसरामध्ये घनदाट जंगलात बंदुका चालविण्याचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतल्याची माहिती न्यूज १८ लोकमतला एसआयटीच्या सूत्रांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चार विवेकवाद्यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांच्या निशाण्यावर आणखी तीन जण होते. तिघांची नाव न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली आहेत.

यातलं पहिलं नाव आहे मराठा सेवा संघाचे श्रीमंत कोकाटे, दुसरं नाव आहे तत्कालीन पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ आणि तिसंर नाव आहे विजय सोनावणे. पानसरेंच्या हत्येप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेच्या कॉम्प्युटरमध्ये धर्मद्रोही नावानं एक फोल्डर सेव्ह करण्यात आला होता.  त्या फोल्डरमध्ये तीघांचे फोटो सेव्ह करण्यात आले होते. सीबीआयनं दाखल केलेल्या आरोप पत्रामधला हा सगळा तपशील न्यूज १८ लोकमतच्या हाती लागला आहे. एकीकडे गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेच्या चौकशी दरम्यान मिशन अँटी हिंदूचा पर्दाफाश झालाय. अशातच मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या आणखीन तीन जणांची नावं समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय.

VIDEO : भर पावसात खासगी बस जळून खाक !

दरम्यान, एकीकडे सनातन बंदीसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विरोधाभास पाहायला मिळतोय. कारण सनातन बंदीसाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राला नव्यानं प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी न्यूज १८ लोकमतला दिली होती. तर दुसरीकडे सनातनवर बंदी घालण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आलाच नसल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नेमके कोण खरे बोलतंय आणि सनातन बंदी संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संभ्रम कशासाठी हे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 07:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...