डॉ.दाभोलकर हत्या: 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला CBI कोठडी

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोळकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 03:22 PM IST

डॉ.दाभोलकर हत्या: 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला CBI कोठडी

मुंबई, 26 मे- डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे वकील आणि सल्लागार संजीव पुनाळेकरांनासह विक्रम भावेला काल मुंबईत सीबीआयने अटक आली. आज या दोघांना पुणे कोर्टात हजर करण्यात आले.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेकडून कटाची माहिती मिळवायची आहे. गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे ज्यांची विल्हेवाट लावली, त्याबाबत माहिती घ्यायची आहे. पुनाळेकर आणि भावे यांचा कसा सहभाग होता, हे जाणून घ्यायचे आहे. यासाठी सीबीआयच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली. ही मागणी कोर्टाने मान्य करत संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला एक जूनपर्यत सीबीआय कोठडी सुनावली आहे. मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील जामिनावर बाहेर असलेले संशयित आरोपी समीर कुलकर्नीही कोर्ट परिसरात हजर आहे. संजीव पुनाळेकर हे या हत्याकांडातील आरोपींचेही वकील आहेत. विक्रम भावे यांचे मालेगाव स्फोटाशी कनेक्शन असल्याचे समजते.

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करणे, हत्येच्या कटात सहभागी होणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर तर आरोपींना प्रत्यक्ष घटनास्थळ रेकी, दाभोलकरांची ओळख करुन देणे, हत्येच्या कटात सहभागी होणे या आरोपाखाली विक्रम भावे याला अटक करण्यात आली आहे. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी तसेच त्याचे मालेगाव ब्लास्ट कनेक्शन असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पुण्यात 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्य डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर..

संजीव पुनाळेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर होते. अखेर सीबीआयने त्यांच्याभोवती फास आवळला. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतलेले सचीन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या चौकशीत सीबीआयली संजीव पुनाळेकरबाबत माहिती मिळाली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश प्रकरणात आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबात ही संजीव पुनाळेकरचे नाव समोर आले होते.पुनाळेकरांनी गौरीलंकेश हत्या प्रकरणात आरोपींना मदत केल्याची आरोपींनी कबूली दिली होती.

हल्लेखोरांनी नष्ट केली चार पिस्तुलं, सीबीआयचा दावा

Loading...

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वैभव राऊत आणि शरद कळसकर यांनी यावर्षी चार पिस्तुलं तोडून त्यांची मुंबई आणि ठाण्यात विल्हेवाट लावली. ही पिस्तुलं त्यांनी तोडून खाडीमध्ये फेकून दिली, असा दावा सीबीआयने केला आहे. हत्येच्या वेळी एकूण चार जण उपस्थित होते, असा दावाही सीबीआयने केला आहे. डॉ.दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, एम.एस.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी ही चार पिस्तुलं वापरण्यात आली होती का, हे आता तपासातून पुढे येणार आहे.

वैभव राऊत आणि शरद कळसकर 23 जुलै 2018 च्या रात्री वैभव राऊतच्या घरुन निघाले. त्यांच्याकडे असलेल्या चार पिस्तुलांची त्यांना विल्हेवाट लावायची होती. ती पिस्तुलं त्यांनी तोडली आणि पिस्तुलाचे तुकडे एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात फेकून दिले. हे तुकडे जिथे फेकले ती जागा ठाण्यातील कळव्याचा पूल, वसईमधला खाडी पूल किंवा कल्याणमधील खाडी पूल यापैकी एक जागा होती.


SPECIAL REPORT: डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 03:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...