डाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपूत्र-प्रणव मुखर्जी

डाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपूत्र-प्रणव मुखर्जी

  • Share this:

नागपूर, 07 जून :  डाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपूत्र असून या सुपुत्राला आदरांजली वाहायला मी इथे आलो आहे असा अभिप्राय माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची हेडगेवारांच्या निवास्थानी असलेल्या पुस्तकात लिहिलाय.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपासाठी नागपुरात आहे.  संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रणव मुखर्जी यांनी महाल परिसरातील कोठी रोड भागात संघाचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांच्या निवासस्थानालाही भेट दिलीय. यावेळी तिथे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट झाली. निवासस्थानातून बाहेर पडत असताना भागवतांनी प्रणवदांना हाताचा आधार दिला.

यावेळी प्रणवदांनी हेडगेवार निवासस्थानात असलेल्या व्हिजिटर बूकमध्ये डाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे सुपूत्र असून

या सुपुत्राला आदरांजली वाहायला मी इथे आलो आहे असा अभिप्राय लिहिलाय.

गेली अनेक दशके काँग्रेसमध्ये काम केल्याने काँग्रेसच्या विचारधारेतून घडलेले प्रणव मुखर्जी यावेळी स्वयंसेवकांना नेमके काय मार्गदर्शन करणार याकडे देशाचे लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 06:04 PM IST

ताज्या बातम्या