मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले; मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले; मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा

धरणाची साठवण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर आहे. काल सकाळपर्यंत यात २११ दशलक्ष घन मीटर साठा होता. दुपारनंतर धरणात पाण्याची आवक वाढली आणि आज पहाटेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले.

  • Share this:

केज, 22 सप्टेंबर: बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प तब्बल 6 वर्षांनी तुडूंब भरला असून धरणाचे सहा दरवाजे आज सकाळी ६ वाजता उघडण्यात आले आहेत. तसंच पाणीही मांजरा नदीत सोडण्यात आलं आहे.

धरणाची साठवण क्षमता २२४ दशलक्ष घनमीटर आहे. काल सकाळपर्यंत यात २११ दशलक्ष घन मीटर साठा होता. दुपारनंतर धरणात पाण्याची आवक वाढली आणि आज पहाटेपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे आज सकाळी ६ वाजता सहा दरवाजे २५ सेंटिमीटरपर्यंत उघडण्यात आले. एवढे उघडण्यात आले असून त्यातून सध्या १५० घनमीटर प्रती सेकंद दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान काल रात्री मराठवाड्यातील जायकवाडी धरणातून शेवटी पाणी सोडण्यात आलं. काल रात्री 11 वाजता जवळपास 10 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आलं. सध्या जायकवाडी धरण 97 टक्के धरण भरलं असून नाशिक  अहमदनगरहून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्यानं हे पाणी सोडलं आहे. या धरणाचे 18 दरवाजे दिड फुटाने उघडण्यात आले आहे. तब्बल 10 वर्षांनतंर जायकवाडी धरण इतका तुडूंब भरला आहे.यामुळे मराठवाड्यातील  धरणांंमधील पाणीसाठा वाढू लागला आहे.

मराठवाड्यातील धरणं प्रचंड भरल्यामुळे यावर्षी तरी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2017 11:40 AM IST

ताज्या बातम्या