डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील फेज मधील किचन क्राॅफ्ट या कंपनी संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 14, 2018 08:39 PM IST

डोंबिवली एमआयडीसीत आगडोंब, किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग

डोंबिवली, 14 मे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये किचन क्राॅफ्ट कंपनीला भीषण आग लागलीये. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या रवाना दाखल असून आग विझवण्याचं काम सुरू आहे.

डोंबिवली शहरातील एमआयडीसीमधील फेज मधील किचन क्राॅफ्ट या कंपनी संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली. आगीमुळे धुराचे लोट शेजारी इमारतीमध्येही घुसले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या दाखल आहे. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

किचन क्राफ्ट कंपनी शेजारील वृद्धाश्रमाच्या बिल्डिंगमध्ये आगीचा धूर गेल्याने तेथील ४ वृद्धांना तात्काळ पूर्वेतील आरोग्यम इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2018 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...