ठाणे, 28 ऑक्टोबर: ठाण्यात एक क्रुरपणाची हद्द पार करणारी घटना घडली आहे. एका माणसाने मुद्दामहून भटक्या कुत्र्याच्या अंगवरुन गाडी चालवून त्याला ठार केलं आहे. ही घटना निवारा पालस्प्रिंग सोसायटी या ठिकाणी घडली आहे.
24 तारखेला घडलेल्या घटनेचा सीसीटीवी फुटेज हाती लागला आहे. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसते आहे की, आरोपी गिरीश संत, आपल्या इको स्पोर्ट गाडीमधून पुढे येत असताना, सोसायटीमध्ये बसलेल्या एका कुत्र्यवार मुद्दामहून गाडी घेऊन जातात. त्यानंतर खाली कुत्रा आहे हे माहित असूनही ती गाडी खूप वेळ तशीच ठेवतात, नंतर गाडी मागे घेऊन पुन्हा त्या कुत्र्याच्या अंगावरुन घेऊन जतात. यामध्ये एक माणूस त्यांना चेतावणी देतो देखील, पण ते दुर्लक्ष करतात.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये पाहिल्यानंतर प्राणिप्रेमी संजीव दिघे यांनी नौपाडा पोलोस स्टेशन मध्ये या गिरीश संत विरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार गिरीश संत याच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र अजून अटक करण्यात आलेली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा