S M L

दीड वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला, हातात कान घेऊन रुग्णालयात पोहचले कुटुंबीय

बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात भटक्या कुत्र्याने एका चिमुकल्याचे कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Updated On: Aug 31, 2018 12:48 PM IST

दीड वर्षाच्या मुलावर कुत्र्याचा हल्ला, हातात कान घेऊन रुग्णालयात पोहचले कुटुंबीय

सोलापूर, 31 ऑगस्ट : बार्शी तालुक्यातील माणकेश्वर गावात भटक्या कुत्र्याने एका चिमुकल्याचे कान तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणकेश्वर गाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळात वाढला आहे. ताहेर बादेला या दीड वर्षाच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात ताहेर गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

ताहेर बादेल हा चिमुकला आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्या कानाचा जबर चावा घेतला. यात ताहेरचा एक कानच कुत्र्याने तोडून टाकला आहे. हा तुटलेला कान ताहेरच्या पालकांनी चक्क कॅरीबॅगमधून रुग्णालयात नेला आहे. हल्ल्यानंतर ताहेरने आक्रोश करताच त्याच्या घरच्यांनी त्याला पाहिलं आणि तात्काळ नजिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकारासंदर्भात महापालिकेला कळवण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा असं मागणी आता संपूर्ण गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यात ताहेर हा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

10 वर्षांच्या डेटिंगनंतर वरुण धवन चढणार बोहल्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2018 12:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close