S M L

डॉक्टरांचा 12 तासांचा संप मागे

आयएमएनं नॅशनल मेडिकल कमिशन बिलाच्या मुद्दयावर आज १२ तासांचा बंद पुकारला होता. पण हे विधेयक स्टॅंडिंग कमिटीकडे पाठवण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 2, 2018 06:03 PM IST

डॉक्टरांचा 12 तासांचा संप मागे

02 जानेवारी : आयएमएनं नॅशनल मेडिकल कमिशन बिलाच्या मुद्दयावर आज १२ तासांचा बंद पुकारला होता. पण हे विधेयक स्टॅंडिंग कमिटीकडे पाठवण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

नॅशनल मेडिकल कमिशन बिलच्या मुद्यावरुन खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या संघटनेचा पुकारलेला १२ तासाचा बंद, वेळेपूर्वीचं मागे घेण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे पाठवत असल्याची माहिती संसदेत दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

या विधेयकातील वेगवेगळ्या तरतुदींवर आयएमएनं आक्षेप घेतला होता.

आयएमएच्या विरोधाची कारणं

१) वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही.

Loading...

कोणतीही खासगी वैद्यकीय महाविद्यालयं पदवी आणि पदव्युत्तर जागा आपल्या मनाप्रमाणे वाढवू शकतील.

२) या महाविद्यालयांतील फक्त ४० टक्के जागांवर सरकारचं नियंत्रण असणार आहे.

 ६० टक्के जागांची फीस खासगी वैद्यकीय महाविद्यालयं ठरवणार असल्यानं गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण नीट घेता येणार नाही.

३) दंडांच्या दरामध्ये ५ कोटी ते १०० कोटी अशी रक्कम असल्यानं भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता

 ४) हे विधेयक जनविरोधी, श्रीमंतांच्या बाजूनं आहे

५)  भारतीय डॉक्टरांना तोटा तर परदेशी डॉक्टरांना आपला व्यवसाय भारतात करता येईल

एकीकडे आम्हाला रुग्णांची आणि वैद्यकीय व्यवसायाची काळजी असल्याचं डॉक्टर म्हणतायत खरं पण कट प्रॅक्टिसबद्दल मात्र आयएमए बोलायला तयार नाहीये. आम्ही याबद्दल आयएमएच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी यावेळी काहीही बोलण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 2, 2018 06:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close