नागपुरचे डॉ. अमित समर्थ यांनी रशियात फडकवला भारताचा झेंडा

नागपूरचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वाधिक अवघड आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या रशियातील 'रेड बुल ट्रान्स सायबेरियन एक्‍स्ट्रीम' सायकल शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करून नवा इतिहास घडविलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2018 06:23 PM IST

नागपुरचे डॉ. अमित समर्थ यांनी रशियात फडकवला भारताचा झेंडा

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 22 ऑगस्ट : नागपूरचे सायकलपटू डॉ. अमित समर्थ यांनी जगातील सर्वाधिक अवघड आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या रशियातील 'रेड बुल ट्रान्स सायबेरियन एक्‍स्ट्रीम' सायकल शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण करून नवा इतिहास घडविलाय. 9 हजार 100 किलोमिटर अंतराची ही शर्यत पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करणारे ते भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिले सायकलपटू ठरले आहेत.

24 जुलैला मॉस्को येथील प्रसिद्ध लाल चौकातून सुरू झालेली 15 चरणांची शर्यत सहभागी सायकलपटूंना 25 दिवसांत पूर्ण करावयाची होती. डॉ. समर्थ यांनी 379 तास 51 मिनिटे 44 सेकंदात सर्व टप्पे सहजगत्या पूर्ण केले. जर्मनीचे 33 वर्षीय पिअरे बिशॉफ यांनी सर्वांत कमी वेळेची नोंद करीत अव्वल स्थान पटकाविले. डॉ. समर्थ चौथ्या स्थानावर राहिले. खाबारोवस्क येथून सुरू झालेला 768 किमी अंतराचा निर्णायक टप्पा व्लादिवोस्तोक येथे संपला.

शर्यतीत डॉ. समर्थ यांच्यासह जगभरातील सहा सायकलपटू सहभागी झाले होते. या शर्यतीदरम्यान नागपूरचेच देवनाथ पिल्ले आणि चेतन थाटे यांनी त्यांना साथसंगत केली. डॉ. समर्थ यांनी गेल्यावर्षीही पाच हजार किलोमीटर अंतराची 'रेस अक्रॉस अमेरिका' शर्यत 11 दिवस 11 तासांत पूर्ण केली होती. ही शर्यत पहिल्या प्रयत्नात पूर्ण करणारे ते पहिले भारतीय सायकलपटू ठरले होते. 22 फेब्रुवारीला डॉ. समर्थ नागपुरात येणार आहेत. त्यांच्या या कामगिरीनं त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांच्या या यशात त्यांच्या कुटुंबियांचाही मोलाची साथ आणि सहभाग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 06:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close