S M L

तुरूंगात साजरा झाला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

धार्मिक ग्रंथातील अध्यात्माचे विचार कैद्यांपर्यंत पोचावे आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून आयुष्याची सुरुवात करता यावी, यासाठी कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 1, 2018 02:54 PM IST

तुरूंगात साजरा झाला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

01  जानेवारी:  तुरूंग म्हटलं की गुन्हेगार , चोर, अशा लोकांचे चेहरे समोर येतात.  पण जर अशा तुरूंगात हरिपाठ झाला तर! ही कल्पना नाही तर खरोखर साध्य झालं आहे.  वर्षानुवर्षे तुरुंगात असलेल्या कैद्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा तुरुंग प्रशासनानं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केलाय.  या कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

धार्मिक ग्रंथातील अध्यात्माचे विचार कैद्यांपर्यंत पोचावे आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना एक चांगली व्यक्ती म्हणून आयुष्याची सुरुवात करता यावी, यासाठी कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय.  केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातच नव्हे  तर संपूर्ण राज्यातील तुरुंगांमध्ये हा उपक्रम सुरू असल्याची माहिती विठ्ठल जाधव यांनी दिली आहे.

जेलच्या बाहेर पडल्यावर त्यांना एक माणूस म्हणून जीवनाची सुरूवात नव्याने करावी यासाठी पुढील 7 दिवस कीर्तन सप्ताह सुद्धा सुरू करण्यात आला आहे.  हे तर आमच्या हातून न कळत गुन्हा घडला त्याची शिक्षा तर आम्ही भोगत आहोत पण माणूस म्हणून आमचा विचार करत कारागृह प्रशासनाने  सुरू केलेला उपक्रम चांगला असल्याची भावना कैदी ही व्यक्त करत आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close