वाघ देवतेची पूजा करून नाशिकच्या आदिवासींची दिवाळी साजरी

आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक आदिवासी गावाच्या सीमेवर वाघ देवाची दगडी मूर्तीची स्थापना केलेली असते. आणि आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन वाघ देवतेची पूजा करतात. या दिवशी गावात यात्रा भरते

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2017 02:06 PM IST

वाघ देवतेची पूजा करून  नाशिकच्या  आदिवासींची दिवाळी साजरी

नाशिक, 20 ऑक्टोबर:  दिन दिन दिवाळी गाय म्हशी ओवाळी म्हणत वसुबारसनं दिवाळी सणाला सुरवात झाली. शेतकरी या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. मात्र आदिवासी नागरिक या दिवशी वाघ देवतेची पूजा करून दिवाळीला सुरवात करतात.त्यांची दिवाळी थोड्या  वेगळ्या प्रकारे साजरी होते.

आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक आदिवासी गावाच्या सीमेवर वाघ देवाची दगडी मूर्तीची स्थापना केलेली असते. आणि आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन वाघ देवतेची पूजा करतात. या दिवशी गावात यात्रा भरते. वाघ दैवतेसोबत साप, सूर्य, चंद्र, मोर आदींच्या मूर्तींची देखील पूजा केली जाते, प्रथम शेतातील नवीन पीकं,नागली, तांदूळ, कणीस उडीद आदी पीक वाहिली जातात.

शेतात येणाऱ्या नवीन पिकांसोबत मांसाहारी असणाऱ्या वाघाला नैवेद्य म्हणून कोंबडी आणि बोकड्याचा बळी दिला जातो. यावेळी वाघ देवतेला स्मरण करून हे वाघदेवा,नागदेवा आमचे गाय गुरे गुराखी याचं जंगलात फिरताना रक्षण कर कुठलीही इजा करू नको. आमची ही लक्ष्मी आहे हे तुझं भक्ष्य होऊ देऊ नको अशी प्रार्थना केली जाते. यामध्ये लहान मुलांनाचा उत्साह मोठा असतो.

विधीवत पूजा झाल्यानंतर ही आदिवासी मुलं,पारंपरिक वाद्य वाजवून आनंद उत्सव साजरा करतात. हा सोहळा बघण्यासाठी पंचक्रोषीतील नागरिकांची मोठी गर्दी होते. वाघबारसच्या दिवसापासून लक्ष्मीपूजानांपर्यंत आदिवासी गुराखी रोज आदिवासी वस्ती वर धिंडवळीचे गाणं गात जोगवा मागतात. या गाण्यात वाघ,साप,गाय बैल आदींचा उद्धार होईल अशीच गाणी गातात. हे झालं दिवाळी उत्सवाचं निमित्त मात्र वर्षानुवर्षे हा आदिवासी बांधव अजूनही अनेक अडचणीला तोंड देत आहे. आदिवासी समाज असलेल्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याची खंत समाजसेवक व्यक्त करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2017 02:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...