जीएसटीमुळे दिवाळीचा फराळ महागला

जीएसटीमुळे दिवाळीचा फराळ महागला

दिवाळी म्हटलं की नवीन कपडे,फराळ असं सगळंच आलं मात्र यावर्षी जीएसटी मुळे फराळामध्ये तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे फराळाची चव घेण्याआधीच अनेकांची तोंडं कडू झालीयत.

  • Share this:

कपिल भास्कर, 04 आॅक्टोबर : दिवाळी म्हटलं की नवीन कपडे,फराळ असं सगळंच आलं मात्र यावर्षी जीएसटी मुळे फराळामध्ये तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे फराळाची चव घेण्याआधीच अनेकांची  तोंडं कडू झालीयत.

यंदाच्या दिवाळीसाठी फराळ आणताना दिवाळं निघतं की काय, असं वाटू लागलंय. जीएसटीमुळे सर्व पदार्थांचे दर 25 ते 30 टक्क्यांनी वाढलेत.

गेल्या वर्षीच्या दिवाळीत लाडू 240 रुपये किलो होते, आता लाडू गेलेत 300 रुपये किलोवर.. चकली आणि करंजी 320 रुपयांवरून 360वर गेलीय.. सर्वांचे आवडते शंकरपाऴे 200 वरून थेट 240वर गेलेत. अनारसे 320 रुपये किलो होते गेल्या वर्षी, यावर्षी त्यासाठी 360 रुपये मोजावे लागतायत. श्रीखंड 200 रुपये किलोवरून 240वर गेलंय.

जीएसटीमुळे फराळच नाही पण कपडे आणि वाहनंही महाग झालीयेत. त्यामुळे फराळावर खुल्यादिलानं खर्च करणारे सामान्य हात थोडा अखडता घेतायत.

फराळ घरी करायचं ठरवलं तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यावरही जीएसटी आहेच. त्यामुळे यंदाच्या दिवाळीवर महागाईचं सावट आहे असंच म्हणावं लागेल. आयबीएन लोकमत, नाशिक.

दिवाळीवर महागाईचं सावट

पदार्थ            2016                            2017

                   (रु. प्रति किलो)               (रु. प्रति किलो)

लाडू            240                         300

चकली        320                         360

करंजी         320                         360

शंकरपाळे   200                        240

अनारसे       320                         360

श्रीखंड         200                        240

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 02:11 PM IST

ताज्या बातम्या