संपकरी कर्मचाऱ्यांवर प्रशासन योग्य ती कारवाई करणारच- दिवाकर रावते

संपकरी कर्मचाऱ्यांवर प्रशासन  योग्य ती कारवाई करणारच- दिवाकर रावते

लोकांची गैरसोय होत असेल तर ती दूर कशी करणार याची जबाबदारी माझी. बाकी मला काही कल्पना नाही, न्यूज18लोकमतशी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 08 जून : 'कुठल्याही संघटनेनं संप करतोय सांगितलं नाही. मग अचानक इतके गैरहजर कसे? हा प्रश्न एसटी प्रशासन हाताळेल. लोकांची गैरसोय होत असेल तर ती दूर कशी करणार याची जबाबदारी माझी. बाकी मला काही कल्पना नाही,' न्यूज18लोकमतशी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले.

ते म्हणाले, हा संप अधिकृत नाही. बिना नेतृत्व कोणी लढत नाही. त्यांना कोण चिथवतंय का? त्यात ते भरडले जातील. कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी न्यायालीन मार्ग आहे. तो त्यांनी अवलंबवावे. संघटनांचे नेते कामगारांची जबाबदारी घेत नाहीत. त्यांना वाऱ्यावर सोडतात.

आपल्याला कर्मचाऱ्यांची काळजी असल्याचंही ते म्हणाले. दंड करावा, पण कारवाई करू नये याची काळजी मी आजपर्यंत घेत आलोय, नोकऱ्या वाचवल्यात असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2018 12:02 PM IST

ताज्या बातम्या