S M L

एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन करार करणार-परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा

या चर्चेत प्रामुख्याने एसटी कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात चर्चा झाली. गेले काही महिने सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसाठी संप करून आंदोलनं केली होती.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 2, 2018 08:24 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन करार करणार-परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा

02 एप्रिल: महाराष्ट्राची लाईफ लाईन अशी ओळख असलेल्या एसटी महामंडळाची आज सर्व कामगार संघटनांशी मॅरेथॉन चर्चा झाली आहे. यानंतर नवा वेतन करार करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

या चर्चेत प्रामुख्याने एसटी कामगारांच्या वेतनवाढी संदर्भात चर्चा झाली. गेले काही महिने सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीसाठी संप करून आंदोलनं केली होती. पण प्रत्यक्षात कामगारांना काहीच मिळालं नाही.

त्यावर तोडगा काढण्यासाठी आज ही बैठक घेण्यात आली. याच बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवा वेतन करार करण्यासाठी सर्व कामगार संघटनांशी चर्चा केली. सरकार आणि कामगार संघटनांची चर्चा झाल्यावर नवा वेतन करार महिन्याभरात तयार करून, तो १ मे कामगार दिनी जाहीर करण्यात येईल असं आश्वासन अखेर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलं आहे.

आता यानंतर तरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 2, 2018 08:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close