S M L

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतेच टक्केवारी खातात,दिवाकर रावतेंचा आरोप

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे, एसटी कर्मचारी संघटनेचे नेते कर्मचाऱ्यांची टक्केवारी खातात असा सनसनाटी आरोप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलाय.

Sachin Salve | Updated On: Oct 17, 2017 07:30 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतेच टक्केवारी खातात,दिवाकर रावतेंचा आरोप

17 आॅक्टोबर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे, एसटी कर्मचारी संघटनेचे नेते कर्मचाऱ्यांची टक्केवारी खातात असा सनसनाटी आरोप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलाय.

एसटी कर्मचारी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर संपावर गेले आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. दिवाकर रावते यांनी अगोदरच संपकऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची मागणी अमान्य केलीये. आता तर त्यांनी थेट संघटनेवर निशाणा साधलाय.एसटी कामगार नेते कर्मचाऱ्यांची टक्केवारी खातात  असा आरोपच रावतेंनी केलाय.

तसंच संप मागे घेतला नाही तर प्रशासन कारवाईबाबत निर्णय घेईल पण कारवाई करून कामगारांचे आयुष्य खराब करायचे नाही असे मला वाटते. कामगार नेते कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहेत, कामगारांनी त्यांच्या नादी लागू नये असा सल्लाही रावतेंनी दिला.मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की, 7 वा वेतन आयोग देऊ शकत नाही त्यामुळे हा विषय गैरलागू आहे.  काही वेतनवाढ करण्यास तयार आहोत मात्र संप मागे घेतला पाहिजे असंही रावते म्हणाले.

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे, सर्व ठिकाणी खाजगी बस सेवा आम्ही घेत आहोत. त्यामुळे ताण कमी झाला आहे. खाजगी ट्रॅव्हल्स ज्या लूट करत असतील त्यावर कारवाई करू शकत नाही. तसे अधिकार नाहीत अशी कबुलही रावतेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close