एसटी संपात फूट; भोरमध्ये काही कर्मचाऱ्यांची कामाला सुरूवात

भोर तालुक्याअंतर्गत सेवा देण्यास फक्त सुरूवात करण्यात आली आहे. विरोधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विरोध न करता गांधीगिरी करत फक्त टाळ्या वाजवून निषेध व्यक्त केला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2017 01:39 PM IST

एसटी संपात फूट; भोरमध्ये काही कर्मचाऱ्यांची कामाला सुरूवात

पुणे,19 ऑगस्ट:- एसटी कर्मचारी संपात पुणे जिल्ह्यातील भोरमधे फूट पडली आहे. एसटीच्या सेनाप्रणीत संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन सेवा सुरू केली आहे.

भोर तालुक्याअंतर्गत सेवा देण्यास फक्त सुरूवात करण्यात आली आहे. विरोधी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी विरोध न करता गांधीगिरी करत फक्त टाळ्या वाजवून निषेध व्यक्त केला आहे. इतर कुठल्याच संघटना माञ कामावर हजर झालेल्या नाहीत. सेनेच्या संघटनेचे 25 ते 30 कंडक्टर ड्रायव्हर कर्मचाऱ्यांनी कामाला सुरवात केली आहे दरम्यान संपाबाबत काल एका एसटी कर्मचाऱ्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. तर आज एक विद्यार्थ्याने परिवहन मंत्री रावते यांच्याशी संपर्क साधला.

अजूनतरी संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे यापुढे आता सरकार हा प्रश्न कसा सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...