'आता शिट्टी वाजली की फौज तयार राहील', दिवाकर रावतेंची संघावर टीका

आता सिमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची गरज नाही, शिट्टी मारली की फौज तयार राहील अशी उपरोधिक टीका सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव न घेता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2018 07:53 AM IST

'आता शिट्टी वाजली की फौज तयार राहील', दिवाकर रावतेंची संघावर टीका

16 फेब्रुवारी : आता सिमेवर लढण्यासाठी सैन्य भरतीची गरज नाही, शिट्टी मारली की फौज तयार राहील अशी उपरोधिक टीका सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव न घेता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. लष्कराआधी संघाचे स्वयंसेवक लढण्यासाठी तयार राहतील या मोहन भागवत यांच्या विधानालर दिवाकर रावते यांनी टिका केली आहे.

नागपुरात श्रीमंत राजे रघुजी भोसले बहुउद्देशीय संस्थे तर्फे राजरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात रावते बोलत होते. या वेळी भाजप आणि संघ नेतृत्वावर रावते यांनी चांगलीच टीका केली. त्याचबरोबर नितीन गडकरींसह मुख्यमंत्र्यांवरही रावतेंनी निशाणा साधला.

दरम्यान, मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय पडसाद उमटले. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या त्यांच्या खास शैलित कार्टून काढून भागवतांवर टिका केली होती. त्यात आता दिवाकर रावते यांनीही नाव न घेता भागवतांच्या विधानावर टिका केली आहे. आता सैन्याचं काही काम नाही आहे.  फक्त एक शिट्टी मारताच फौज तयार राहील अशी टिका त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 07:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...