उस्मानाबाद जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या रकमेतून 5 कोटी काढले

जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम कर्ज खाती भरून घेतलीय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2017 08:56 PM IST

उस्मानाबाद जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या रकमेतून 5 कोटी काढले

06 एप्रिल : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आडमुठा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम कर्ज खाती भरून घेतलीय.

शासनाने 22 मार्च रोजी परिपत्रक काढून पीक विम्यातील 50 टक्के रक्कम कर्ज खाती जमा करण्याचे आदेश बँकेला दिले होते. मात्र चौफेर टीकेनंतर हा अद्यादेश मागे घेण्यात आला होता.

मात्र, या दोन दिवसात बँकेने तत्परता दाखवत बँकेने तब्बल 5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्यातून परस्पर कर्ज खाती भरून घेतले आहे. अनेक वर्षांपासून राजकीय थकबाकीदारांकडून कोट्यावधीची थकबाकी कायम असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकेचे हे धोरण अन्यायकारक आहे.

तर हा प्रकार चुकीचा असून बँकेने शासनाकडून ही परवानगी घेऊन शेतकऱ्याचे 5 कोटी परत करावे अन्यथा बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन या करणार असल्याचा इशारा शेतकरी देत आहेत.

दरम्यान,  बँकेचे व्यस्थापक विजय घोणसे यांच्याशी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता हा प्रकार घडला आह आणि राज्य शासनाकडे शेतकऱ्याचे पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितले मात्र कॅमऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2017 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...