S M L

गैरव्यवहारांमुळे नाशिकची बाजारसमिती,जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त

बाजारसमितीत गैरव्यवहारांची अनेक प्रकरणं झाली होती

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 30, 2017 02:24 PM IST

गैरव्यवहारांमुळे नाशिकची बाजारसमिती,जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त

30 डिसेंबर: नाशिकची बाजारसमीती  आणि जिल्हाबॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त झालं आहे. या दोन्ही संस्थांमध्ये घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. ही बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली होती.

बाजारसमितीत गैरव्यवहारांची अनेक प्रकरणं झाली होती. थकीत कर्ज,कर्मचाऱ्यांचा थकीत भविष्य निर्वाह निधी,बाजारसमीती निधीचा दुरुपयोग, अनावश्यक जाहिरात खर्च,रोजंदारी कर्मचारी नियुक्ती यासह 10 मोठे ठपके या बाजारसमितीवर लावण्यात आले होते.

अप्पर निबंधक अनिल चव्हाण प्रशासक  आणि  जिल्हा उपनिबंधक यांनी या बरखास्तीचे  आदेश दिले आहे.तर दुसरीकडे नाशिक जिल्हा सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय.  जॉईंट रजिस्टर मिलिंद भालेराव आता बँक प्रशासक म्हणून काम पाहतील. सीसीटीव्ही खरेदीसाठी निविदा रकमेपेक्षा अधिक खर्च केलेली रक्कम, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या अध्यादेशाविरुद्ध दाद मागण्यासाठी बँकेने केलेला खर्च, बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती आणि ३०० लिपिक व १०० शिपायांची नियमबाह्य नियुक्ती, या सर्व गैरप्रकारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2017 02:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close