सुरेश जैन यांना न्यायालयाचा दणका; 750 कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी

सुरेश जैन यांच्यासमोरील अडचणी आता वाढल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 5, 2019 12:35 PM IST

सुरेश जैन यांना न्यायालयाचा दणका; 750 कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी

मुंबई, प्रफुल्ल साळुंखे, 05 मे : जळगावातील राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथ घडून येत आहेत. तब्बल 750 कोटी रूपयांच्या घरकुल घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, ही चौकशी करताना 10 जणांची SIT स्थापन करण्याचे आदेश न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे आता माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह जिल्हा बँकेतील तत्कालीन संचालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बँकेनं कृषिधन कॅटेल फीड, खान्देश बिल्डर , जैन इरिगेशनशी संबंधित इसीपी कंपनीला बेकायदेशीर कर्ज दिल्याची तक्रार दिवंगत नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी दिली होती. त्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. पण, तपास न करता क्लीन चिट दिल्याने या प्रकरणाचा पुन्हा तपस व्हावा अशी उच्च न्यायालयात विजय पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने SIT मार्फत चौकशीचे आदेश दिले.


गडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात? 18 जणांविरोधात FIR

पोलीस अधिक्षकांना धरलं धारेवर

Loading...

जिल्हा बँकेत एका अर्जावर 270 कोटीचं कर्ज देणे, विमानतळ घोटाळा, वाघूर पाणी पुरवठा योजना यामध्ये 750 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या साऱ्या प्रकरणांमध्ये सुरेश जैन यांना क्लिन चीट देणाऱ्या तपास अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना देखील सुनावणी दरम्यान न्यायालयानं धारेवर धरलं.


VIDEO: मी संन्यासी आहे, साध्वी प्रज्ञासिंह यांचं निवडणूक आयोगाला उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 11:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...