Lok Sabha Election 2019 : दिंडोरीत राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? सुप्रिया सुळेंचा लागणार कस

Lok Sabha Election 2019 : दिंडोरीत राष्ट्रवादीत अंतर्गत वाद? सुप्रिया सुळेंचा लागणार कस

दिंडोरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागू शकतो अशी चर्चा सध्या सुरू आहे.

  • Share this:

दिंडोरी, बब्बू शेख, 15 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पाच उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये दिंडोरीतून धनराज महाले यांना तिकीट देण्यात आलं. पण, राष्ट्रवादीला अंतर्गत वादाचा फटका बसणार का? अशी चर्चा दिंडोरीमध्ये सुरू झाली आहे. दिंडोरीतून भारती पवार यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण, प्रत्यक्षात मात्र धनराज महाले यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे नाराज भारती पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापर्यंत 17 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये सुनील तटकरे- रायगड, सुप्रिया सुळे - बारामती, उदयनराजे भोसले - सातारा, आनंद परांजपे - ठाणे, गुलाबराव देवकर - जळगाव, राजेंद्र शिंगणे - बुलढाणा, राजेश विटेकर - परभणी, संजय दिना पाटील- ईशान्य मुंबई, बाबाजी पाटील - कल्याण, धनंजय महाडिक - कोल्हापूर, समीर भुजबळ- नाशिक, डॉ.अमोल कोल्हे - शिरुर, धनराज महाले - दिंडोरी, पार्थ पवार, मावळ आणि बजरंग सोनवणे - बीड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


Lok sabha elections 2019 भाजप शिवसेनेच्या 'मनोमिलना'ला आजपासून सुरूवात


पवारांची नाराजी भारती पवारांना भोवली?

काही दिवसांपूर्वी भारती पवार यांनी एका सभेदरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीत कौटुंबिक कलहामुळे माझं तिकीट कापलं जाऊ नये. 2014मध्ये मी केवळ काही मतांनी पडले होते असं जाहीर विधान केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज झाले. त्याचाच फटका हा भारती पवार यांना बसल्याचं बोललं जात आहे. उमेदवारीबाबत अनिश्चितता वाटताच भारती पवार यांनी भाजपमध्ये चाचपणी करत राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला.पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

यावर बोलताना भाजपच्या सूत्रांनी हरीश्चंद्र चव्हाण हे निष्ठावंत आणि जेष्ठ नेते असून त्यांचं तिकीट कापण्याचा संबंधच येत नाही अशी प्रतिक्रिया 'न्यूज18 लोकमत'ला दिली.

दरम्यान,सुप्रिया सुळे यांनी भारती पवार यांना मुंबईला बोलावत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.शिवाय त्यांना आगामी विधानसभेकरता उमेदवारी दिली जाण्याची देखील शक्यता आहे.


Loksabha Election 2019: राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पाहा 17 उमेदवारांची नावे


कोण आहेत धनराज महाले?

राष्ट्रवादी काँग्रेसनं आत्तापर्यंत लोकसभेसाठी 17 उमेदवार जाहीर केले आहेत. यावेळी दिंडोरी मतदारसंघाकडून धनराज महाले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच धनराज महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. धनराज महाले हे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे पुत्र आहेत.त्यांनी 2009 मध्ये शिवसेनेकडून विधानसभा लढवली होती. शिवाय ते विजयी देखील झाले होते. त्यामुळे आता भारती पवार यांच्याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

VIDEO : 'एकच वादा, अजितदादा' मावळमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2019 05:26 PM IST

ताज्या बातम्या