काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार दिलीप मानेंसह 5 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल;मानेंनी आरोप फेटाळले 

एका महिलेला फसवून तिच्याशी खोटं लग्न करून नंतर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2017 10:57 PM IST

काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार दिलीप मानेंसह 5 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल;मानेंनी आरोप फेटाळले 

सोलापूर,28 नोव्हेंबर: - कॉँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार  आणि माजी आमदार दिलीप माने यांच्यासह पाच जणांवर कोर्टाच्या आदेशान्वये  बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेला फसवून तिच्याशी खोटं लग्न करून नंतर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

दिलीप माने यांचा भाचा  सागर भोसले व संबंधित  तरूणीची भेट एका वेबसाईटवर झाली.त्यानंतर तुळजापूरच्या मंदिरात या दोघांनी खोटं लग्न केलं. त्यानंतर सोलापूर रोडवरच्या एका लॉजवर भोसले यांनी तिच्याशी शरीर संबंध ठेवले. नंतर लग्नाचे फोटो व्हायरल करतो अशी धमकी माने यांच्या भाच्याने त्या तरूणीला दिली आणि जबरदस्ती माने यांच्यासोबत संबंध ठेवण्यास तिला भाग पाडलं असा आरोप करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे दिलीप माने यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी त्यांना फसवलं जातं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच या मुलीने याआधीही त्यांच्यांसह अनेकांना  असंच गोवण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या मुलीवर ते अब्रुनुकसानीचा दावा येत्या काळात ठोकू शकतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 10:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...