नाशिकमध्ये डिझेल माफियांनी डिझेल पाईपलाईन फोडली, शेतात साचले डिझेलचे तळे

भारत पेट्रोलियमच्या मुंबईहून मनमाड डेपोत जाणारी ही 18 इंच व्यासाची पाईपलाईन आहे. देशातील 6 राज्यांना या पाईपलाईनच्या माध्यमातून इंधन पुरवठा केला जातो

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2017 05:53 PM IST

नाशिकमध्ये डिझेल माफियांनी डिझेल पाईपलाईन फोडली, शेतात साचले डिझेलचे तळे

 07 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून जाणारी डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर डिझेल वाया गेलं आहे. या पाईपलाईनला ड्रील करून डिझेल माफियांनी चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

भारत पेट्रोलियमच्या मुंबईहून मनमाड डेपोत जाणारी ही 18 इंच व्यासाची पाईपलाईन आहे. देशातील 6 राज्यांना या पाईपलाईनच्या माध्यमातून इंधन पुरवठा केला जातो. नांदूरमध्यमेश्वर धरणालगत असलेल्या खानगाव थडी शिवारातून जाणाऱ्या या पाईपलाईनला ड्रिल करून डिझेल माफियांनी चोरी केलीये.  अश्याप्रकारे पाईपलाईन लिकेज होण्याची ही तिसरी घटना असून या अगोदर सिन्नर आणि मनमाडच्या अंकाई किल्ल्या जवळ पाईपलाईन लिकेज झाली होती.

हा लिकेज नसून इंधन चोरट्यांनी टॅप लावून पाईपलाईन मधून इंधन चोरी करण्याचा हा प्रकार आहे. या घटनेमुळे पाईपलाईन शेतात घुसलेल्या डिझेलमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. ग्रामपंचायतच्या गुरुचरण जमिनीसह सुपीक शेतीत डिझेल घुसल्यानं शेतीला मोठा फटका बसलाय. गोदावरी नदी पात्रालगत असलेल्या शेतीत घुसलेलं लाखो लिटर डिझेल आणि याच पाण्यावर असलेली 12 गावांची पाणीपुरवठा व्यवस्था धोक्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 05:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...