महाशिवरात्रीला भीमाशंकरमध्ये नागफडी पाॅईंटवर 500 फूट दरीत पडून तरुण-तरुणीचा मृत्यू

महाशिवरात्रीला भीमाशंकरमध्ये नागफडी पाॅईंटवर 500 फूट दरीत पडून तरुण-तरुणीचा मृत्यू

आज महाशिवरात्र असल्यामुळे भीमाशंकर इथं भाविकांची गर्दी दर्शनासाठी होत असते. आज दुपारी चार वाजता ही घटना घडली.

  • Share this:


रायचंद शिंदे, प्रतिनिधी

भीमाशंकर,04 मार्च : भीमाशंकर येथे एका अज्ञात तरुण आणि तरुणीचा नागफडी पॉईंटवरुन पाचशे फूट दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार वाजता घडली आहे.

मात्र, ही हत्या की आत्महत्या याबाबत चर्चा होत आहे.  आज महाशिवरात्र असल्यामुळे भीमाशंकर इथं भाविकांची गर्दी दर्शनासाठी होत असते. आज दुपारी चार वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला की, नागफणी पॉईंटवर एक तरुण आणि तरुणी ५०० फूट दरीत कोसळले असून दोन्ही मृत्युमुखी पडले आहेत. याबाबत खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी तातडीने पोलीस कर्मचार्‍यांसह नागफणी पॉईंट जाऊन पाहिले असता एका तरुणीचा मृतदेह यांना दुर्बिणीद्वारे दिसून आला मात्र दरी पाचशे फूट खोल असल्यामुळे तरुणाचा मृतदेह तसंच झाडेझुडपे असल्यामुळे दिसून आला नाही.

या ठिकाणी पोलीस कर्मचारी दरीत उतरण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी NDRFच्या जवानांना याबाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 08:31 PM IST

ताज्या बातम्या