जात लपवली म्हणून केला स्वयंपाकिणीवर गुन्हा दाखल; पुरोगामी पुण्यातील संतापजनक प्रकार

धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदार हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले आहेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2017 10:36 AM IST

जात लपवली म्हणून केला स्वयंपाकिणीवर गुन्हा दाखल; पुरोगामी पुण्यातील संतापजनक प्रकार

पुणे,8 सप्टेंबर: एकीकडे पुण्यात जातीअंताच्या लढाईची चळवळ सुरू असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर खरी जात न सांगितल्यामुळे ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदार हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले आहेत.

खोले यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपती बसतात. घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी होती. 2016 मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी या नावाची एक स्त्री आली. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असं ती म्हणाली. तिच्या माहितीवरुन खोले यांनी  धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून ती ब्राह्मण आहे की नाही याची खात्री केली. त्यानंतर लगेचच त्यांनी तिला घरच्या धार्मिक कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावले.

मे 2016 मध्ये वडिलांच्या श्राद्धासाठी तसंच सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी आणि 2017 मध्ये वडिलांच्या श्राद्धासह गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक या स्वयंपाकिणीने केला होता. दोन वर्षात त्यांनी सहा वेळा स्वयंपाक केला. बुधवारी निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचं सांगितलं. त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असं खोटे नाव का सांगितलं, आमच्या घरी ब्राह्मण समाजातीलच सुवासिनीने केलेलाच स्वयंपाक चालतो असं विचारलं. यावर निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळ केली अशी फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

या प्रकाराची नेमकी तक्रार कशी दाखल करुन घ्यावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. पण अखेर पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम ४१९ (फसवणूक), कलम ३५२ (हल्ला करणे) आणि कलम ५०४ (धमकी) अन्वये तक्रार दाखल केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 10:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...