विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ला सेना पदाधिकाऱ्याने दिला चोप

विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विवाह करून त्याची मालमत्ता बळकावणाऱ्या एक जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 08:18 PM IST

विधवा महिलांना फसवणाऱ्या 'लखोबा लोखंडे'ला सेना पदाधिकाऱ्याने दिला चोप

12 मे : विधवा महिलांना सहानुभूती मिळवून त्यांच्याशी विवाह करून त्याची मालमत्ता बळकावणाऱ्या एक जलसेवकाला धुळ्यात शिवसेनेच्या पदाधिकारी हेमा हेमाडे यांनी शहर पोलीस ठाण्यातच चोप दिला.

धुळे येथील पाणी पुरवठा विभागात जलसेवक म्हणून कार्यरत असलेला मुरलीधर रंगराव मिस्तरी यांचा मिनाक्षीबाई सोबत सन 2007 मध्ये पुनर्विवाह झाला. विवाहानंतर मिनाक्षीबाईंची मालमत्ता मुरलीधरने स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यानंतर या दोघात वाद होऊ लागले.

मुरलीधर मिस्तरी हे मिनाक्षीबाईला सतत मारहाण करुन तिचा छळ करू लागले. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. मिस्तरी हा न्यायालयात कामकाजासाठी हजर राहत नसल्याची तक्रार मिनाक्षीबाईची होती. यामुळे कामकाज लांबत होते. न्याय मिळण्यास विलंब होत होता. हा प्रकार मिनाक्षीबाईंनी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमा हेमाडे यांना सांगितला.

त्यानुसार हेमा हेमाडे यांनी मुरलीधर मिस्तरी यांना फोन केले. सुरुवातीला फोनवरच मिस्तरी आणि हेमाडे यांच्यात वाद झाले. या प्रकरणी आज मिनाक्षीबाई यांच्यासह हेमा हेमाडे या शहर पोलीस ठाण्यात आल्यात. त्यानंतर मिस्तरींनाही तेथे बोलवण्यात आले.

पोलीस ठाण्याच्या आवारातच मिस्तरी आणि हेमाडे यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद विकोपाला गेल्याने हेमा हेमाडे यांनी थेट मिस्तरी यांची धुलाई करीतच त्यांना निरीक्षकांच्या दालनात नेले. यावेळी मिस्तरीची पत्नी मिनाक्षीबाई हिनेही मिस्तरीला शिवीगाळ करीत संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अखेरीस या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीनुसार मुरलीधर मिस्तरी आणि हेमा हेमाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 08:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...