राईनपाडा हत्याकांड : तिसरा मारेकरी जंगलात लपून बसला होता,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राईनपाडा हत्याकांड : तिसरा मारेकरी जंगलात लपून बसला होता,पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दशरथ जमावाला चिथावणी देण्याचे काम करत असतांनाची दृश्य पोलिसांच्या हाती लागली आहेत

  • Share this:

 धुळे,08 जुलै : राईनपाडा हत्याकांड प्रकरणातील तिसरा महत्वाचा संशयित आरोपी दशरथ पिंपळसे याला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बाभड यांच्या पथकाने वार्सा परिसरातील जंगलातून दशरथ याला अटक केली असून तो राईनपाड्यातीलच रहिवासी आहे.

दशरथ जमावाला चिथावणी देण्याचे काम करत असतांनाची दृश्य पोलिसांच्या हाती लागली आहेत. दशरथच्या चिथावणीमुळे मेल्यानंतरही नवनाथ गोसावी समाजाच्या पाचही जणांना मारहाण केली जात होती. आता या प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयितांची संख्या 26 वर गेली आहे.

राईनपाडा हत्याकांडातला मुख्य आरोपी महारू पवारला अटक

दरम्यान, अटक केलेल्या महारू आणि हिरालाल यांचे रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले असून नमुनेही पोलिसांनी फाॅरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.

राईनपाड्यात काय घडलं? अफवांचा बाजार, बेभान झालेला जमाव आणि रक्ताचा सडा

Loading...

05 जुलैला राईनपाडा हत्याकांडातील मुख्य आरोपीला नवापूरमधून अटक करण्यात आली आहे.  महारू पवार असं त्याचं नाव आहे. राईनपाडामध्ये १ जुलैला पाच जणांची मुलं पळवण्याच्या अफवेतून ठेचून हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणातल्या मुख्य आरोपीला नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातून पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या पथकानं अटक केली आहे. यामुळे अन्य आरोपींचा तपास घेणं पोलिसांना शक्य होईल.

धुळ्यात 5 जणांच्या हत्येनं हादरला महाराष्ट्र, आतापर्यंत 23 संशयितांना अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2018 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...