धुळ्यात 'गुजरात'ची मतदान यंत्र नकोत, काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

मतदान यंत्र गुजरातची आहेत, ती आम्हाला नकोत, धुळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

News18 Lokmat | Updated On: Dec 4, 2018 06:14 PM IST

धुळ्यात 'गुजरात'ची मतदान यंत्र नकोत, काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी

दिपक बोरसे, धुळे, 4 डिसेंबर : धुळे महानगरपालिकेत वापरली जाणारी मतदान यंत्र ही गुजरात आणि जळगाव येथे वापरलेली असल्याने ती बदलली जावीत तसेच  व्ही पॅट मशीनचा वापर करण्यात यावा यावा अशी मागणी आमदार कुणाल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केलीय, मनपा निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आघाडीचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.


EVM मशिन्स सदोष असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला. तसेच सर्वच मशीन्सची पुन्हा चाचणी व्हावी अशी मागणी महापौर कल्पना महाले यांनी केली. तर आयोगाने दोन मशीन्सवर  प्रात्यक्षिकं करून शंका दूर करण्याचा निर्णय आयोगाने  घेतला आहे.


तसेच प्रचार संपल्यानंतर मतदान संपेपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात राहील, यासाठी आयोगाने योग्य ती दखल घ्यावी अशी मागणीही यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात 356 उमेदवार उरले आहेत.

Loading...


शहरातील तीन लाख 29 हजार मतदार हे येत्या 9 डिसेंबर रोजी मतपेटीत उमेदवारांचं भवितव्य ठरविणार आहेत. अर्ज छाननी नंतरच्या निर्णयांविरूद्ध 29 इच्छुक उमेदवारांनी न्यायालयात दाद मागितली होती, मात्र न्यायालयानं 28 जणांची याचिका फेटाळून लावत फक्त एका जागेवरती याचिकेवर निर्णय दिलाय.


 


 

'कुंभकर्णाला जागं करण्यासाठी पंढरपुरात सभा घेणार'; उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2018 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...