धुळ्यात अनिल गोटेंचा लोकसंग्राम भाजपचा खेळ बिघडवणार का?

धुळ्यात अनिल गोटेंचा लोकसंग्राम भाजपचा खेळ बिघडवणार का?

अनिल गोटींची जिंकण्याची ताकद नसली तरी पराभव करण्याएवढं उपद्रमुल्य त्यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळं भाजपची चिंता वाढली आहे.

  • Share this:

दीपक बोरसे, धुळे, 26 नोव्हेंबर : धुळे महापालिका निवडणुकीआधीच आमदार अनिल गोटे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानं निवडणुकीची रंगत वाढली आहे. यावेळी पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना परस्परांविरूद्ध निवडणूक लढवत आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीही निर्णायक घटक आहे. सर्व शक्ती पणाला लावणाऱ्या भाजपचा खेळ गोटेंचा लोकसंग्राम बिघडवणार का अशी चर्चा आता सुरू झालीय.

धुळे महापालिकेच्या निवडणुकीत आता चित्र स्पष्ट झालंय. गोटेंच्या प्रवेशामुळं चौरंगी लढत होणार आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि गोटेंचा लोकसंग्राम यांच्यात खरा सामना रंगणार आहे. धुळ्यात गोटेंचा जनसंपर्क दांडगा आहे आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्कही आहे. त्यामुळं त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

महपालिका निवडणुकीत जय-पराजयाची अंतर हे अतिशय कमी असतं. भाजपमधल्या अनेक असंतुष्टांना गोटेंनी हाताशी धरलंय. त्यामुळं जिंकण्याची ताकद नसली तरी पराभव करण्याएवढं उपद्रमुल्य त्यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळं भाजपची चिंता वाढली आहे. सोमवार ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारिख आहे. त्यामुळं रात्री उशीरा सर्व चित्र स्पष्ट होणार हेआहे.

मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे या निवडणुकीत खास लक्ष घालत आहेत. त्यामुळं भाजपचं पारडं जड आहे.

धुळे महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. 19 प्रभागांमध्ये 74 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार असून 10 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

गोटे का आहेत नाराज?

आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या आमदारांना पत्र लिहून पक्षावर अनेक खळबळजनक आरोप केलेत. धुळ्यातल्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्याने संतापलेल्या गोटे यांनी आमदारकी आणि भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्री गिरीष महाजन यांच्याशी त्यांचा वादही झाला होता.

त्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपच्या सर्व आमदारांन पत्र लिहूनं अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. भाजपमध्ये छोटा राजन आणि दाऊदशी संबंधीत गुंडाना प्रवेश दिला जातो, विधानपरिषद निवडणुकीत विनोद तावडेंनी पैसे वाटले, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार पाडण्याचा डाव फसला. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना किंमत नाही असे अनेक आरोप आपल्या सात पानी पत्रात केले आहेत. गोटेंच्या या लेटर बॉम्बमुळे राजकीय क्षेत्रात खलबळ उडाली आहे.

 


 

धक्कादायक VIDEO: जेल की गुंडांचा अड्डा, दारू पार्टीसह काय-काय होतंय पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 06:33 PM IST

ताज्या बातम्या