धुळ्यात अनिल गोटेंचं पानिपत, फक्त पत्नीने मैदान मारले!

अनिल गोटे यांनी आपल्या लोकसंग्राम पक्षाकडून 62 उमेदवार रिंगणात उतरवले होते. 62 पैकी फक्त एकच उमेदवार विजयी झाला.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 04:56 PM IST

धुळ्यात अनिल गोटेंचं पानिपत, फक्त पत्नीने मैदान मारले!

10 डिसेंबर : "मी बंड केलं तर थंड करून टाकेन" अशी भीमगर्जना करत भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी आपल्या पक्षाविरोधात दंड थोपडले. पण मतदारराजाने अनिल गोटे यांना आस्मान दाखवले. अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम संघटनेचा पार धुव्वा उडाला. त्याचा फक्त एकच उमेदवार निवडून आला. त्या होत्या त्यांच्या पत्नी हेमा गोटे. तर मुलगा तेजस गोटे पराभूत झाला.

पक्षात गुंडांना प्रवेश दिला जातो अशी आरोप करत अनिल गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकला आणि स्वत:चा लोकसंग्राम पक्ष स्थापन केला. अनिल गोटे यांच्या बंडामुळे धुळे महापालिकेची निवडणूक कमालीची तापली. एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आणि दुसरीकडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा विरोध यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली.

परंतु, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जोरदार प्रचार करत विजय खेचून आणला. मागील निवडणुकीत अवघ्या ३ जागा जिंकणाऱ्या भाजपने यंदा 57 जागांवर मुसंडी मारत एकहाती सत्ता राखली.

दुसरीकडे, आपल्या पक्षाला आव्हान देणारे अनिल गोटे चांगलेच तोंडघशी पडली. अनिल गोटे यांची पत्नी हेमा गोटे आणि मुलगा तेजस गोटे यांनाही मैदानात उतरवले.

हेमा गोटे या प्रभाग क्रमांक '5 ब'मधून उभा राहिल्यात. त्यांना 4193 मतं मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार योगिता पाटील यांना 1023 मतं आणि भाजपच्या उमेदवार भारती मोरे 2720 यांना मत मिळून पराभव झाला.

Loading...

तर तेजस गोटेने प्रभाग क्रमांक 1मधून निवडणूक लढवली. भाजपचे उमेदवार नरेंद्र चौधरी या प्रभागात विजयी झाले. त्यांना 3899 मतं मिळाली. तेजस गोटे यांना फक्त 1427 मतं मिळाली.

अनिल गोटे यांनी आपल्या लोकसंग्राम पक्षाकडून 62 उमेदवार रिंगणात उतरवले होते. 62 पैकी फक्त एकच उमेदवार म्हणून त्यांची पत्नी हेमा गोटे विजयी झाल्यात. उर्वरीत सर्व 61 उमेदवार पराभूत झाले.

परंतु, अनिल गोटे यांनी या पराभवाचं खापर ईव्हीएम मशीनवर फोडलं. भाजपचा हा विजय पैशाच्या बळावर झाला आहे. भाजपनं ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करून हा विजय मिळवला असा आरोप अनिल गोटे यांनी केला. तसंच त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरही गंभीर आरोप केले.

========================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 04:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...