News18 Lokmat

धुळे लोकसभा निवडणूक : भाजप इथे हॅटट्रिक करणार का?

धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर भिस्त दाखवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली. 2009 आणि 2014 मध्ये सलग विजय मिळवल्यानंतर आता भाजप पुन्हा एकदा विजय मिळवणार का याची चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 02:15 PM IST

धुळे लोकसभा निवडणूक : भाजप इथे हॅटट्रिक करणार का?

धुळे, 18 मे : धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर भिस्त दाखवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली. 2009 आणि 2014 मध्ये सलग विजय मिळवल्यानंतर आता भाजप पुन्हा एकदा विजय मिळवणार का याची चर्चा आहे. इथे मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे.

धुळ्यामध्ये 29 एप्रिलला मतदान

धुळ्यामध्ये चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे 52. 42 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. 2009 मध्ये इथे फक्त 42.54 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मागच्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला मोदी लाटेचा फायदा झाला.

सुभाष भामरेंचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष भामरे यांनी अमरीश पटेल यांचा 30 हजार मतांनी पराभव केला होता. सुभाष भामरेंना 5 लाख 29 हजार 450 मतं मिळाली तर अमरीश पटेल यांना 3 लाख 98 हजार 727 मतं मिळाली.

Loading...

23 मे ला निकाल

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि बागलाण हे विधानसभा मतदारसंघ येतात.

या मतदारसंघात मतदारांचा कौल भाजपला आहे की काँग्रेसला हे 23 मे ला च कळू शकेल.

उत्तर महाराष्ट्रात धुळे,रावेर,जळगाव,नंदुरबार अशा जागांवर भाजप - शिवसेना युतीची कामगिरी कशी होते याबदद्ल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

===============================================================================

SPECIAL REPORT : मामाच्या गावाला जाऊया आणि पाणी भरूया!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 18, 2019 07:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...