S M L

घराची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 2 बहिणींचा जागीच मृत्यू

धुळे जिल्ह्यातील आरावे गावात घर पडून त्याखाली दाबले गेल्याने दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलीय.

Updated On: Jul 19, 2018 12:52 PM IST

घराची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 2 बहिणींचा जागीच मृत्यू

धुळे, 19 जुलै : धुळे जिल्ह्यातील आरावे गावात घर पडून त्याखाली दाबले गेल्याने दोन चुलत बहिणीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडलीय. शिंदखेडा तालुक्यातील आणावे गावातील भटू देशखुम यांच्या घराची भिंत कोसळल्याने त्याच्या दोन कन्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर भुटू आणि त्यांची पत्नी निर्मला गंभीर जखमी झाले आहेत. शेतमजुरीसाठी आलेले भटू भालचंद्र देशमुख यांचं कुटुंब शिंदखेडा तालुक्यातील आरावे गावात भाडयाचे घर घेऊन राहत होते.

पुजारीच झाला अत्याचारी, गोव्याच्या मंगेशी देवस्थानात 2 युवतींवर विनयभंग

रुपाली देशमुख (17) धनश्री देशमुख(15) असं या मयत मुलींचं नाव आहेत. वडील भटू आणि आई निर्मला हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमीं झालेल्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात जदाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाऊसाचे पाणी भिंतीत मुरल्याने घराची भिंत जीर्ण झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा...

Loading...

जिममध्ये व्यायाम करताना या 6 गोष्टी चुकूनही विसरू नका

पुण्यात सोशल मीडियावरून सुरू होतं सेक्स रॅकेट...

पैशांची गुंतवणूक करताय? मग या 10 वाईट सवयी टाळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 12:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close