अनिल गोटेंनी भरला अपक्ष अर्ज, गिरीश महाजन म्हणाले..अनामत रक्कम वाचवून दाखवा

अनिल गोटेंनी भरला अपक्ष अर्ज, गिरीश महाजन म्हणाले..अनामत रक्कम वाचवून दाखवा

अनिल गोटे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये आणि आपली अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असे खुले आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना दिला आ

  • Share this:

धुळे, 9 एप्रिल- आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा देणारे अनिल गोटे यांनी धुळे लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आपल्या समर्थकांसोबत अनिल गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरलो असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अनिल गोटे यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी धुळे शहरात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी उमेदवारीबाबत भूमिका मांडताना भाजप आणि डॉ. सुभाष भामरे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असून डॉ.भामरे यांना आपला विरोध असल्याचे गोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना स्पष्ट केले.

काय म्हणाले गिरीश महाजन?

अनिल गोटे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये आणि आपली अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असे खुले आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना दिला आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये गिरीश महाजन आणि अनिल गोटे यांच्यामध्ये शाब्दिक कलगीतुरा पाहायला मिळतोय.  गिरीश महाजन यांनी धुळ्यात येऊन आपल्या आव्हान देऊन दाखवावे, असे खुले आव्हान गोटे यांनी दिले होते.  याबाबत जेव्हा गिरीश महाजन यांना धुळ्यात विचारणा केली असता त्यांनी गोटे यांना पुन्हा प्रतिआव्हान दिले आहे.  गोटे यांनी आपली अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असा टोला महाजन यांनी गोटे. गोटे यांनी कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेऊ नये , त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवावी आणि आपली अनामत रक्कम वाचवून दाखवावी, असे खुले आव्हान गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना दिला आहे.

गोटे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजप आणि डॉ. सुभाष भामरे यांच्यावरती टीका केली होती. डॉ. भामरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना गिरीश महाजन यांनी गोटे यांना खुले आव्हान देत 'महाजन विरुद्ध गोटे' या वादाची रंगत वाढवली आहे.

शक्तिप्रदर्शन करत डॉ. सुभाष भामरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

धुळे लोकसभा मतदार संघासाठी भाजप उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे,  पर्यटनमंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आणि भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. भामरे यांनी धुळे शहरातील शिवाजी पुतळ्यापासून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे लोकसभा मतदारसंघाची जागा ही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईल, असा विश्‍वास यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. डॉ. सुभाष भामरे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर मतदार भाजपला पसंती देतील, असा विश्वास व्यक्त केला.

जाहीर सभेनंतर काँग्रेस उमेगवार, आमदार कुणाल पाटील यांचे मामा सुभाष देवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच आमदार पाटील यांचे चुलत भाऊ उत्कर्ष पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे डॉ. भामरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस हा भाजपला ऊर्जा देणारा तर काँग्रेसला खिंडार पाडणारा ठरल्याचे डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.


VIDEO: 'आमच्याकडे ना मोदीवाले आले, ना राहुलवाले'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 06:23 PM IST

ताज्या बातम्या